आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: निरीक्षणगृहातून पळालेले भुसावळ गँगरेपमधील तीन संशयित सापडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निरीक्षणगृृहाच्या शेडवरून शुक्रवारी तिन्ही मुले उड्या मारून पळाले - Divya Marathi
निरीक्षणगृृहाच्या शेडवरून शुक्रवारी तिन्ही मुले उड्या मारून पळाले
जळगाव - जानेवारी महिन्यातील भुसावळ सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन संशयित अल्पवयीन मुलांनी शुक्रवारी निरीक्षणगृहाच्या पत्र्याच्या शेडवरून उडी मारीत दुपारी पलायन केले. मात्र, उडी मारताच पायाला दुखापत झाल्यामुळे तो योगायाेगाने एका पोलिस कर्मचाऱ्यास सुधारगृहाबाहेरच तर दुसरा संशयित जिल्हापेठ परिसरात एका गॅरेजजवळ सापडला. तर तिसरा मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास जुन्या बसस्थानकाजवळ आढळला. दरम्यान, दुपारी वाजून ३० मिनिटांनी शौचालयात घेऊन जात असताना केअर टेकरची नजर चुकवून हे तिघे जिन्यावरून धावत गेले पत्र्याच्या शेडवरून त्यांनी निरीक्षणगृहाच्या बाहेर उड्या घेतल्या होत्या. चुकीच्या ठिकाणी बांधलेल्या शेडमुळे पलायन करणे सोपे गेले असे दिसून आले आहे. 
 
भुसावळ येथील रेल्वेच्या उड्डाणपुलाखाली २१ जानेवारी राेजी एका अल्पवयीन मुलीवर चार अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केला हाेता. या धक्कादायक घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. 
 
चौकशीनंतर दोषींवर कारवाई करणार 
- निरीक्षण गृहातीलतीनसंशयित पळून जाण्याच्या प्रयत्नात हाेते. त्या पैकी दाेघांना पाेलिसांनी ताब्यात घेतले अाहे. याप्रकरणी चाैकशी करून दाेषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. सारिकामेटकर, अधीक्षक, निरीक्षणगृह 

कंटाळा आल्यामुळे पळालो 
निरीक्षणगृहाच्या जिन्याच्या कठड्याला खेटून पत्र्याचे शेड तयार केले अाहे. पावसाळ्यात हाेणाऱ्या त्रासामुळे शेड बांधले. मात्र, ते थेट निरीक्षणगृहाच्या भिंतीपर्यंत अाहे. वीस ते पंचवीस फुटांच्या भिंतीवरून काेणी पळू शकत नसल्याचा निरीक्षणगृहाच्या प्रशासनाचा अंदाज शुक्रवारी फाेल ठरला अाहे. 

गेल्या महिनाभरापासून आम्ही इथे अडकून पडलो आहोत. त्याचा कंटाळा अाल्यामुळे आम्ही पळून जाण्याचे ठरवले, असे एका संशयिताने सांगितले. 

एसडीपीअाेंना चाैकशीचे अादेश 
- निरीक्षण गृहातूनगुन्ह्यातीलसंशयित पळून जातात. ही गंभीर बाब अाहे. यासंदर्भात उपविभागीय पाेलिस अधिकारी सचिन सांगळे यांना चाैकशीचे अादेश दिले अाहेत.
डाॅ.जालिंदर सुपेकर, जिल्हा पाेलिस अधीक्षक 

एसडीपीअाेंनी घेतले फैलावर 
निरीक्षण गृहातून संशयित पळून गेल्यानंतर उपविभागीय पाेलिस अधिकारी सचिन सांगळे निरीक्षणगृहात अाले. त्यांनी काेणत्या रस्त्याने पळून गेल्याचे निरीक्षणगृहाच्या अधिकाऱ्यांना विचारले. त्यांनी रस्ता दाखवल्यावर सांगळे यांनी चांगलेच फैलावर घेतले. 
 
पुढील स्लाईडवर वाचा ,भिंतीवरून उडी मारली...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...