आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कचरा उचलणाऱ्या वाहनांवर आता जीपीएस यंत्रणेची नजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महापालिकेतर्फे स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. कचरा उचलणाऱ्या सर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यामुळे ही वाहने कचरा उचलण्यासाठी केव्हा जातात हे समजणार आहे.
स्वच्छता अभियानांतर्गत श्हरातील एकाही भागात कचरा साचणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. त्याचबरोबर शहरात कचराकुंडीमुक्त प्रभाग हे अभियान राबवले जात आहे. शहरातील ज्या नागरिकांकडे शौचालय नाही. त्यांना शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून निधी देण्यात येत आहे. या उपक्रमातूून शहर हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानंतर आता पुढील टप्प्यात स्वच्छतेचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण ९०० गुणांचे आहे. नियमित कचरा उचलण्याच्या नियोजनासाठी १०० गुण, डीपीआरप्रमाणे शिफारस केलेली पदे कार्यरत कर्मचारी संख्येला १८ गुण, रस्त्यावर दिवसातून दोन वेळा झाडलोट केल्यास २३ गुण, कर्मचाऱ्यांच्या हजेरीला २३ गुण, कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास २३ गुण देण्यात आले आहेत. ९०० गुणांचे विभाजन २३ प्रकारांत करण्यात आले आहे. स्वच्छतेच्या पाहणीसाठी केंद्रस्तरीय पथक महापालिका क्षेत्रात येणार आहे. ते पथक ५०० गुण देणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रात सर्व विभागातील कचरा दररोज उचलून तो डेपोवर टाकण्यात येतो. हे काम वेळेत होणे आवश्यक आहे. त्यासाठी आता कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांवर जीपीएस सिस्टिम बसवण्यात येणार आहे. त्यामुळे कचरा उचलण्यासाठी वाहन केव्हा गेले, डेपोवर केव्हा कचरा टाकला हे कळणार आहे.
स्वच्छता सर्वेक्षणासाठी सेल तयार
स्वच्छता अभियानांतर्गत महापालिकेतील अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक सेल तयार करण्यात आला असून, सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे हे या सेलचे अध्यक्ष आहेत. ते स्वच्छता अभियानाचा वेळोवेळी आढावा घेणार आहेत.
स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी थम्ब यंत्रणा
शहरात स्वच्छता कर्मचाऱ्यांतर्फे स्वच्छता करण्यात येते. त्यांना वेगवेगळा विभाग देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या नियमित हजेरीसाठी थम्ब यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हजेरीचा रोजचा अहवाल प्रशासनाला प्राप्त होणार आहे. या कामाची जबाबदारी स्वच्छता कर्मचाऱ्यांवर साेपवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...