आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरणा नदीचे प्रदूषण न राेखल्यास महापाैरांसह अायुक्तांविरुद्ध गुन्हा, पर्यावरण मंत्री कदम यांचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगाव शहरातील सांडपाणी गिरणा नदीत जात असून जलप्रदूषण वाढत अाहे. यामुळे नैसर्गिक स्त्राेत प्रदूषित हाेत असल्याने ते तातडीने राेखा अन्यथा महापालिकेच्या अायुक्तांसह महापाैरांविरुुद्ध गुन्हा दाखल करेल, असा सज्जड दम बुधवारी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भरला. या वेळी त्यांनी शहरातील सांडपाणी प्रक्रिया तसेच मेहरूण तलावाच्या विकासासाठी निधी देण्याची घाेषणाही केली.
 
गेल्या काही महिन्यापासून बांभाेरी ग्रामपंचायतीने जळगाव शहरातील सांडपाण्यामुळे पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने सांडपाणी राेखण्याची मागणी केली अाहे. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध केले हाेते. बांभाेरीसह दाेन गावांना पाणीपुरवठा करणारी विहीर नदी पात्रात अाहे. मात्र, जळगाव शहरातील निमखेडी परिसरातील सांडपाणी थेट नदीत साेडले जाते. त्यामुळे विहिरीतील पाणी प्रदूषित हाेत अाहे. याचा परिणाम नैसर्गिक स्त्राेतांसह नागरिकांच्या अाराेग्यावर हाेत अाहे. नदीच्या पात्रात साेडण्यात अालेल्या सांडपाण्यामुळे जलप्रदूषण हाेत असल्याने त्याची दखल घेत राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अजिंठा विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा अायुक्त किशाेर राजेनिंबाळकर महापाैर नितीन लढ्ढा यांच्याशी चर्चा केली. मनपाने तातडीने नदीत जाणारे सांडपाणी राेखण्याची सूचना केली. नांदेड येथे यापूर्वी गुन्हे दाखल केले अाहेत. तसेच गुन्हे जळगावातही अायुक्त महापाैरांविरुद्ध दाखल केले जातील, असा इशारा दिला. महापाैर लढ्ढा यांनी अमृत याेजनेतून भुयारी गटारींची याेजना प्रस्तावित असून निविदा प्रक्रिया राबवण्यात येत अाहे. लवकरच हा प्रश्न सुटेल असे अाश्वासित केले.
 
प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री
नागपूर येथील एका एजन्सीमार्फत भुसावळ येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम केले जाणार अाहे. त्या ठिकाणचे प्रक्रिया झालेले पाणी दीपनगर अाैष्णिक विद्युत प्रकल्पाला देण्याचे नियाेजन सुरू अाहे. त्यानुसार जळगाव महापालिका देखील प्रक्रिया केलेले पाणी देईल का? याची विचारणा करण्यात अाली अाहे. महापाैर लढ्ढा यांनी त्यासंदर्भात सखाेल माहिती काढण्याचे अादेश दिले अाहेत. महापालिकेने पाणी देण्याची तयारी दाखवल्यास पाणी कसे वाहून नेणार, यासाठीचा खर्च काेण करणार, तसेच पाण्याचे काय दर असतील, याची माहिती घेण्यात येणार अाहे.
 
कारंज्या उभारा, पैसे देताे
महापाैरांनीमेहरूण तलावासाठी निधी देण्याची विनंती केली. त्यावर कदम यांनी ते काेटींचा निधी देण्याची तयारी दाखवली. मेहरूण तलाव सुशाेभित करा, त्या ठिकाणी जलप्रदूषण हाेणार नाही याची काळजी घ्या. कारंज्या उभारा, झाडे लावा, अशा सूचना केल्या. दरम्यान माजी आमदार सुरेश जैन यांनीदेखील मंत्री कदम यांच्यासाेबत चर्चा केली.
 
सांडपाणी प्रक्रियेसाठी निधीची तयारी
महापालिकेलासांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारायचा असेल तर त्याविषयी सखाेल प्रस्ताव सादर करावा. यासाठी कन्सल्टंट नीलेश पवार यांना पाठवून देताे. त्यांचे मार्गदर्शन घ्या, प्रकल्प उभारण्याची तयारी दाखवल्यास राज्य शासनाकडून ५० टक्के केंद्राकडील ५० टक्के निधी उपलब्ध करून देण्याची तयारी मंत्री कदम यांनी दाखवली.
बातम्या आणखी आहेत...