आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेजात बहिणीला छेडणाऱ्या मवाल्याची भावाने केली धुलाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात मवाल्यांनी धुमाकूळ घातला असून मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले अाहेत. बाहेती महाविद्यालयात शिकणाऱ्या बहिणीची अनेक दिवसांपासून छेड काढणाऱ्या एका मवाल्याला तिच्या भावाने चांगलाच धडा शिकवला. मंगळवारी दुपारी २.३० वाजता मवाल्याला मणियार लाॅ काॅलेजच्या मैदानावर अाणून त्याची तरुणीचा भाऊ मित्राने चांगलीच धुलाई केली. हा प्रकार सुरू असताना जिल्हापेठ पाेलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्याने सर्वांनी धूम ठाेकली. दरम्यान, छेडछाडीच्या विराेधात कारवाई करण्यासाठी पाेलिस प्रशासनाने निर्भया पथकाची नियुक्तीकेली अाहे. पण ते ठाेस कारवाई करीत नसल्याने मवाल्यांची हिंमत वाढली अाहे.
शाळा, महाविद्यालयाचा परिसर सार्वजनिक ठिकाणी दरराेज छेडछाडीच्या घटना घडत असतात. पण मुली महिला उगाच त्रास नकाे, म्हणून त्या गाेष्टींकडे कानाडाेळा करतात. परिणामी मवाल्यांना ही गाेष्टी फावत असल्याने ते बिनधास्तपणे मुलींची छेड काढतात. बाहेती महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीची त्याच महाविद्यालयातीलच एक मवाली विद्यार्थी अनेक दिवसांपासून छेड काढत हाेता. सुरुवातीला या विद्यार्थिनीने छेडछाडीकडे दुर्लक्ष केले पण त्रास अधिक वाढत गेल्याने तिने अखेर पोलिसांना पाहून पळ काढताना विद्यार्थी.

केस : अाॅक्टाेबरलाखेडी येथील ६वी ते ९व्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या घरात चिठ्ठ्या टाकणाऱ्या मजनूला पालकांनी चाेप देऊन एमअायडीसी पाेलिसांच्या स्वाधीन केेले हाेते.
केस : २४सप्टेंबर राेजी नवीन बसस्थानकात विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या शेख जावेद शेख नईम याला प्रवाशांनी चाेप देऊन पाेलिसांच्या ताब्यात दिले हाेते.
केस : ११अाॅगस्टला नूतन मराठा महाविद्यालयात विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या मजनूला पालकांनी चाेप दिला हाेता.
बातम्या आणखी आहेत...