आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक किडनी दिनानिमित्त माेटारसायकल रॅलीद्वारे जनजागृती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रोटरीक्लब आरोग्यदीप फाउंडेशनतर्फे जागतिक किडनी दिनानिमित्त गुरुवारी सकाळी जनजागृतीपर मोटारसायकल रॅली काढण्यात अाली. चारचाकी वाहनावर किडनीची प्रतिकृती ध्वनिक्षेपकाद्वारे माहिती दिली जात होती. 
 

रॅलीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. आर. पाटील यांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष नित्यानंद पाटील आरोग्यदीपचे अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
रिंग रोड येथील आरोग्यदीप हॉस्पिटलपासून नूतन मराठा कॉलेज, शिवाजी पुतळा, नेहरू चौक, टॉवर, चित्रा चौक, जी. एस. ग्राऊंड, बसस्थानक, आकाशवाणी चौकमार्गे गणपतीनगरातील रोटरी हॉल येथे रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत आपली किडनी कशी वाचवावी मधुमेहाविषयी माहितीपत्रके वितरित करून तसेच फलकाद्वारे जनजागृती करण्यात आली.
 
राज स्पेअर्सचे प्रदीप खिंवसरा यांनी रॅलीतील दुचाकीस्वारांना हेल्मेट उपलब्ध करून दिले होते. रॅलीमध्ये रोटरीचे डॉ. जयंत जहागीरदार, प्रभाकर जंगले, डॉ. तुषार फिरके, योगेश गांधी, गिरीश कुळकर्णी, प्रदीप खिंवसरा, संदीप शर्मा, दिलीप जैन, श्याम अग्रवाल, राजेश वेद, आरोग्यदीपचे डॉ. प्रमोद पाटील, जयंत चौधरी, रोटरी सदस्य, आरोग्यदीपचे कार्यकर्ते, अनेक वैद्यकीय कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
बातम्या आणखी आहेत...