आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेलाणीच्या चाैथ्या मजल्यावरून काच डाेक्यात पडली; तरुण जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काच निखळलेली खिडकी आणि वर चौकटीत जखमी सय्यद जुबेर. - Divya Marathi
काच निखळलेली खिडकी आणि वर चौकटीत जखमी सय्यद जुबेर.
जळगाव- गाेलाणी मार्केटमध्ये बुधवारी सकाळी १०.३० वाजता चाैथ्या मजल्यावर कामगार दुकानाची साफ सफाई करताना खिडकीची काच अचानक निघून ती तळमजल्याजवळून जात असलेल्या तरुणाच्या डाेक्यात पडली. यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा सामन्य रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे. 

धरणगाव येथील सय्यद जुबेर सय्यद जहांगिर (वय १८) हा गाेलाणी मार्केटमधील अभिनव माेबाइल या दुकानात माेबाइल दुरुस्तीचे प्रशिक्षण घेत अाहे. यासाठी ताे धरणगाव ते जळगाव दरराेज रेल्वेने अप-डाऊन करताे. बुधवारी सकाळी ९.३० वाजता ताे गाेलाणी मार्केटच्या तळमजल्यावर पाणी पिण्यासाठी जात हाेता. त्या वेळी चौथ्या मजल्यावर एका दुकानात तरुण सफाई करत होता.
 
या वेळी स्वच्छतेदरम्यान खिडकीचा काच निघून ताे थेट जुबेर याच्या डोक्यात पडला. त्यामुळे जुबेरच्या डाेक्याला गंभीर इजा होऊन रक्ताची धार लागली. हे पाहून मार्केटमधील नागरिक धावत अाले. त्यांनी जुबेरला खासगी रुग्णालयात नेले; परंतु जखम गंभीर असल्याने खासगी रुग्णालयातून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. 

मुलगा जखमी झाल्याचे कळताच जुबेरचे वडील सय्यद जहांगीर मोठा भाऊ सय्यद निसार नातेवाईक तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय अाले. दरम्यान, जुबेर याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...