आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या गाडीवरून सोनसाखळीचोरी, अजिंठा विश्रामगृहाजवळील घटना.

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातसोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ मंगळवारीदेखील सुरूच होता. अजिंठा विश्रामगृहाजवळून दुपारी २.१५ वाजेदरम्यान भगीरथ इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका दुचाकीवर जात असताना चोरट्यांनी धावत्या दुचाकीवरून त्यांची २७ ग्रॅम वजनाची सोनसाखळी ओरबाडून नेली. या वेळी मुख्याध्यापिकेने चोरट्यांचा पाठलाग केला. परंतु, ते पळून जाण्यास यशस्वी झाले; तर रिंग रोड परिसरात दुपारी वाजता चोरट्यांचा सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. दरम्यान, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिस त्यांचा शोध घेतआहे.
लीलावती कॉलनीतील रहिवासी भगीरथ इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका आशा मधुकर चौधरी (वय ५६) ह्या दुपारी वाजता दुचाकी(एमएच १० बीडी ६९८७)ने नातवाला शिकवणीसाठी रामानंदनगरात सोडायला गेल्या होत्या. तेथून घरी परतताना अजिंठा विश्रामगृहाजवळ त्यांच्यामागून पल्सर गाडीवर दोन युवक आले. गाडीच्या मागे बसलेल्या चोरट्याने चौधरी यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून पळ काढला. त्यापाठोपाठ चौधरी यांनीही दुचाकीची गती वाढवून त्यांचा पाठलाग केला. या दरम्यान चोरटे त्यांच्यापासून जास्त दूर अंतरावर नसल्यामुळे त्यांनी धावत्या दुचाकीवरून अनेक जणांना मदतीसाठी हाका मारल्या; परंतु कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. तरीदेखील चौधरी ह्या चोरट्याचा पाठलाग करत महामार्गावरील अग्रवाल हॉस्पिटलपर्यंत आल्या. मात्र, चोरटे महामार्गाने फरार हाेण्यास यशस्वी झाले. या मार्गावरील एका खासगी क्लासेसच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चाेरटे कैद झाले असून रामानंदनगर पोलिसांनी त्या कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेतले आहे.
चोरीच्या वेळी सोनसाखळी धरून ठेवताना महिला.

महिलेच्या सतर्कतेने वाचली सोनसाखळी
पद्मालय विश्रामगृह परिसरातील सुलोचना प्रकाश कर्नावट (वय ४५) ह्या मंगळवारी दुपारी वाजता आस्था हॉस्पिटलशेजारी रस्त्यावर उभ्या होत्या. या वेळी समाेरून पल्सर या गाडीवर दोन चोरटे आले. त्यातील गाडीवर मागे बसलेल्या चोरट्याने कर्नावट यांची साेनसाखळी ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु, कर्नावट यांनी एका हाताने सोनसाखळी धरून ठेवल्यामुळे चोरट्याला ती तोडता आली नाही. परिणामी, त्यांची पाच तोळ्यांची सोनसाखळी वाचली. दुचाकी चालवणाऱ्याने निळा तर मागे बसलेल्याने पांढऱ्या रंगाचा टी शर्ट परिधान केला होता. हे चोरटे आस्था हॉस्पिटलबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. जिल्हापेठ पोलिसांनी ते फुटेज ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, दोन्ही प्रकार एकाच टोळीने केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.