आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने खरेदीसाठी झुंबड; दोन कोटींची उलाढाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- सराफव्यापाऱ्यांचा संप मागे घेण्यात आल्यानंतर मंगळवारी पहिल्याच दिवशी खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. त्यामुळे दिवसभरात जवळपास दोन कोटींची उलाढाल झाली. दुपारनंतर सगळीच दुकाने उघडण्यात आल्याचे दिसून येत होते.

सराफ बाजारात ३८ दिवसांपासून संप सुरू होता. त्यामुळे दुकाने बंद होती. त्यातच लग्नसराईचे दिवस असतानाही सोने खरेदी कठीण झाले होते. सोन्याच्या व्यवसायात काम करणाऱ्या कारागिरांनाही घराकडे परतावे लागले. सध्या दहा दिवसांसाठी दुकाने उघडण्यात आली आहेत. मंगळवारी दुकाने उघडल्यानंतर २९ हजार २५० रुपयांपासून दर सुरू झाले. सायंकाळपर्यंत त्यात १०० रुपयांनी वाढ झाली होती. लग्नासाठी दािगने खरेदी करणाऱ्यांनी दुपारनंतर गर्दी केली. त्यातही काही लहान दुकाने उघडण्यात आलेली नव्हती. दुपारनंतर ही दुकानेही उघडली गेली. तब्बल ३८ दिवसांनंतर सराफांची दुकाने उघडल्याने खरेदीदारांची एकच गर्दी झाल्याचे िचत्र िदसून अाले. िदवसभर खरेदीदारांची सर्वच लहानमाेठ्या सराफांकडे गर्दी हाेती. दरम्यान, मंगळवारी जवळपास दाेन ते अडीच काेटींपर्यंत उलाढाल झाल्याचा अंदाज शहरातील सराफांकडून व्यक्त करण्यात अाला अाहे. दरम्यान, दुकाने १४ पासून उघडणार असल्याच्या गैरसमजातून काही जण खरेदीसाठी अाले नाहीत. मात्र, दुकाने उघडी असल्याचे समजल्याने सायंकाळी अधिक गर्दी झाली होती.

तूर्त माघार...
ग्राहकांचीअडचणलक्षात घेऊन अाणि सरकारकडून चर्चेची तयारी दाखविली गेली. त्यामुळे संप मागे घेण्यात अाला अाहे. त्यात सर्वच राजकीय पक्षांकडूनही अांदाेलनाबाबत मध्यस्थीची तयारी दाखविली अाहे. त्यावर २४ पर्यंत निर्णय झाल्यास पुन्हा संप पुकारला जाणार अाहे. -विक्रम राठाेड, सराफसंघटना अध्यक्ष