आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराफाकडे सापडल्या लाखांच्या जुन्या नाेटा, जळगावात पाेलिसांची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 जळगाव- रथचौकात सोन्याच्या घाऊक विक्रेत्याकडून ५०० आणि एक हजार रुपयांच्या रद्द झालेल्या सुमारे 3 लाख रुपयांच्या नोटा शनिपेठ पोलिसांनी जप्त केल्या. योगेश मोरे असे असे सोने विक्रेत्या व्यापाऱ्याचे नाव आहे. तो जोशीपेठेतील रहिवासी आहे. या नोटा आपल्याच असल्याचा दावा त्याने केला असून, याप्रकरणी आयकर विभाग पुढील चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास योगेश मोरे रथ चाैकात फिरत असताना त्याचा संशय आल्याने शनिपेठ पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक सचिन बेंद्रे, विनोद मराठे, नरेंद्र ठाकरे यांनी त्याची चौकशी केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. सखोल चौकशी केली असता, त्याच्याकडे 2 लाख ९३ हजार ५०० रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या 1 हजार अाणि ५०० रुपयांच्या नाेटा सापडल्या. त्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या असून, गुन्हा नोंद करण्यात आलेला नव्हता. 
 
पैसे स्वत:चेच... 
नाेटबंदी झाल्यानंतर जळगाव शहरात जुन्या नाेटा सापडल्याची एकही घटना घडलेली नाही. मात्र, शुक्रवारी रात्री याेगेश माेरे या तरुणाजवळ 2 लाख ९३ हजार रुपयांच्या जुन्या नाेटा सापडल्या अाहेत. त्या स्वत:च्याच असल्याचा दावा त्याने पाेलिसांकडे केला आहे. पाेलिसांनी हे प्रकरण अायकर विभागाकडे हस्तांतरित केले असल्याचे पोलिस निरीक्षक बेंद्रे यांनी सांगितले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...