आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्ये गुडमॉर्निंग पथकाला पाहून 18 जणांनी धूम ठोकली, तर 4 पथकांच्या हातात 12 जण सापडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उघड्यावर शौचास जाणाऱ्यास गुलाबपुष्प देताना पथक - Divya Marathi
उघड्यावर शौचास जाणाऱ्यास गुलाबपुष्प देताना पथक
यावल - गुडमॉर्निंग पथकातील लोकप्रतिनिधींना पाहून उघड्यावर शौचास बसणाऱ्या १८ जणांनी धूम ठोकली, तर चार पथकांच्या हातात १२ जण सापडले. या सर्वांना लेखी तंबी देवून यापुढे उघड्यावर बसल्यास फौजदारी गुन्हा दाखल करू, शहराच्या स्वच्छतेला गालबोट लावता वैयक्तिक शौचालयाचा लाभ घ्या अशा भाषेत गुलाबपुष्पासह समज देण्यात आली. मंगळवारी पहाटे ही कारवाई झाली. 
 
शहरात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पालिकेने मंगळवारी पहाटे चार गुडमॉर्निंग पथकांद्वारे कारवाई केली. या पथकांमध्ये नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्यासह नगरसेवकांचा समावेश होता. नगराध्यक्षा कोळी यांनी, भुसावळ रस्त्यावरील आई हॉस्पिटलजवळ नगरसेविका पोर्णिमा फालक, कल्पना वाणी, नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे, पालिका कर्मचारी यांच्यासह उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे प्रबोधन केले. वैयक्तिक शौचालय योजना किंवा सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्याचे आवाहन केले. बोरावल गेट भागात सुधाकर धनगर, डॉ.युवराज चौधरी, गट क्र १०१० विहिरमध्ये नगरसेवक राकेश कोलते, धीरज महाजन, राजू फालक, आठवडे बाजार भागात नगरसेवक बशिर मोमीन, मनोहर सोनवणे, जाकीर शेख, समीर खान, मधुकर गजरे, मुकेश गजरे, अरशद खान यांनी प्रबोधन केले. तसेच २५ किंवा २६ मे रोजी चार सदस्यीय समिती पाहणीसाठी येणार आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...