आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धा किलो सोन्याचे दागिने घेऊन साथीदाराचा पळ, गंडवणाऱ्या व्यापाऱ्यास बंगाली कारागिरांनी पकडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - १० तोळे सोन्याच्या बदल्यात अर्धा किलो सोन्याचे दागिने बनवून घेत पोबारा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नाशिकच्या एका सराफ व्यापाऱ्यास बुधवारी दुपारी जळगावातील बंगाली कारागिरांनी मोठ्या हिकमतीने पकडले. अर्धा किलो सोन्याचे दागिने घेऊन आपल्या कामगारास जळगावातून बाहेर पाठवण्याचा नाशिकच्या व्यापाऱ्याचा प्रयत्न होता. मात्र, बंगाली कारागिरांनी व्यापाऱ्याकडे पैशांची मागणी केली, तेव्हा या व्यापाऱ्याने त्यांच्या हाती अर्धा किलो वजनाच्या सोन्याच्या बांगड्या ठेवल्या. बांगड्या तपासल्या असता त्या बनावट निघाल्या. या बनावट बांगड्या देऊन नाशिकचा व्यापारी पोबारा करण्याच्या प्रयत्नात होता; मात्र बसस्थानकावरील रिक्षाचालकांच्या मदतीने बंगाली कारागिरांनी या चलाख व्यापाऱ्यास पकडले. विशेष म्हणजे, या व्यापाऱ्याने बसस्थानकावर आरडाओरड करीत आपल्याला लुटत असल्याचा बहाणा केल्याने रिक्षाचालकांनी बंगाली कारागिरांनाच चोप दिला, परंतु खरी हकिकत कळताच त्याला पकडले.

नाशिकच्या भामट्या व्यापाऱ्याचे नाव शैलेश कुमावत असून तो त्याचा शालक प्रकाश कुमावत (रा. पहूर) आणि एक कामगार तुषार शहाणे अशा तिघांनाही जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. बंगाली कारागिरांच्या सतर्कतेमुळे हे तीन भामटे पोलिसांच्या हाती लागले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. अखेर अर्धा किलो सोन्याचे दागिने परत करण्याच्या बोलीवर हे प्रकरण मिटवण्यात आले.

नोव्हेंबर महिन्यात ऑर्डर : रथचाैकात विकास संतोष जाना ( वय ३८) यांचा दागदागिने घडवण्याचा व्यवसाय आहे. राज्यभरातील सराफा व्यापारी त्यांच्याकडून १५ वर्षांपासून सोन्याचे दागिने तयार करून घेतात. गेल्या महिन्यात नाशिकच्या रविवार कारंजा परिसरातील व्यापारी शैलेश कुमावत आले होते. कुमावत हा सुद्धा गेल्या तीन वर्षांपासून जाना यांच्याकडून दागिने करवून घेतो. गेल्या महिन्यात शैलेशने जाना यांना ६० तोळे (६०० ग्रॅम) सोन्याचे दागिने बनवण्याची अॉर्डर दिली. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे १० तोळे सोने शैलेशने दिले आणि दागिने तयार झाल्यानंतर अर्धा किलो सोन्याचे पैसे आणि घडणावळ दोन्ही देण्याचे त्याने जाना यांना कबुल केले. परंतु, महिनाभरानंतर शैलेशची नियत फिरली. दागिने माणसाकडे द्या, आल्यावर पैसे देतो. नोटबंदीच्या दिवसांमध्ये आधीच व्यवसाय थंडावला अाहे, त्यामुळे ही चांगली आॅर्डर मिळाल्याच्या खुशीत जाना यांनी दागिने तयार करून शैलेशला निरोप दिला. दागिने तयार असल्याचा निरोप मिळताच शैलेश, त्याचा मावस शालक प्रकाश आणि अन्य एक कामगार तुषार शहाणे असे तिघे जण मंगळवारी रात्रीच नाशिकहून कारने (क्र. एमएच- १५, इएक्स- ३५७० ) निघाले. बुधवारी सकाळी जळगावात पोहोचताच शैलेश बंगाली कारागीर विकास जाना यांना भेटला. मी माणूस पाठवत आहे त्याच्याकडे ६० तोळे सोन्याचे दागिने देऊन टाका, मी आल्यावर पैसे देतो, असे त्याने सांगितले. बुधवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास जाना यांनी तुषारकडे दागिने सुपुर्द केले. दागिने मिळताच तुषार आणि प्रकाश कारने नाशिककडे जाण्यास निघाले.
अर्धा किलो सोन्याचे दागिने घेऊन साथीदाराचा पळ; गंडवणाऱ्या...
आपलामाणूस दागिने घेऊन निघाल्याचे कळताच शैलेश पैसे देण्यासाठी रथ चौकात आला. तो जाना यांनाही भेटला. मात्र, त्याचवेळी शैलेशचा मोबाइल खणाणला. फोन एेकून शैलेशने घाबरल्याचे नाटक केले. तो म्हणाला, माझ्या माणसाला मनमाड पोलिसांनी अटक केली आहे. त्याला सोडवण्यासाठी मला जावे लागेल. तो पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे पाहून जाना यांनी त्याच्याकडे पैशांचा तगादा सुरू केला. मात्र, त्याचवेळी शैलेशने चलाखी केली. त्याने ५०० ग्रॅमच्या बांगड्या ठेवून घे, असे जाना यांना सांगितले. सुरुवातीस जाना यांनी बांगड्या घेण्यास नकार दिला मात्र कुमावतच्या अाग्रहापोटी आणि तो अडचणीत असल्याचे पाहून जाना यांनी त्या बांगड्याही तात्पुरत्या ठेवून घेण्याचे मान्य केले. परंतु, या बांगड्यांची शुद्धता तपासण्यासाठी जाना यांनी आपल्या सहकाऱ्यास बांगड्या घेऊन स्वस्तिक गोल्ड रिफायनरीत पाठवले. मात्र, रिफायनरीत दागिन्यांची तपासणी करताच ते बनावट असल्याच सिद्ध झाले.

शिक्षणसोडून मुले रोजगाराच्या...
भाऊलाल योगेश हे दोघे आठवी, नववीत शिकत होते. अचानकच झालेल्या या अपघातामुळे गवळे कुटुंबियांचे छत्र हरपले. गृहिणी असलेल्या आईच्या मनावरही मोठा आघात झाला. कर्ता पुरुष गेल्यामुळे भाऊलाल योगेश यांच्यासमोर किशोरवयात मोठ्या जबाबदाऱ्या येऊन उभ्या राहिल्या. पडत-झडत त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे शिक्षण घेता त्यांनीदेखील आता फर्निचरचे काम सुरू केले आहे. मोठी बहीण आईचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी त्या दोघांनी घेतली. बहीण जयश्रीचे लग्न करण्याचे मोठे आव्हानही त्यांच्यासमाेर आहे. नातेवाइकांच्या मदतीने दोघांनीही परिश्रमाची पराकाष्ठा सुरू केली आहे. उच्च शिक्षण घेऊ शकल्यामुळे पुढे काय होणार? याचे चित्र आज स्पष्ट नाही; पण आल्या त्या परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागतो आहे.

‘ड्राइव्ह’मध्येगवळे कुटुंबिय सहभागी
एका अपघातामुळे गवळे कुटुंबियांचे अख्खे आयुष्य काळोखात गेले. शहरातून जाणारा महामार्ग अपघातमुक्त व्हावा, चौपदरीकरणाचे काम व्हावे यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने हाती घेतलेल्या ‘ड्राइव्ह’मध्ये गवळे कुटुंबीय सहभागी झाले आहेत. अपघातग्रस्त कुटुंबीयांचे दु:ख ते रोजच भोगत आहेत. आपल्यासाेबत घडलेली दुर्दैवी घटना इतर कोणत्याही कुटुंबासोबत घडू नये, अशी भावना त्यांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केली आहे.

खड्डेबुजवण्यास प्रारंभ
जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर गिरणा नदीवरील बांभाेरी पूल ते तरसाेद फाट्यापर्यंत अनेक ठिकाणी खड्डे पडले अाहे. शहरात महामार्गावर ठिकठिकाणी साइडपट्ट्या खाेल गेल्या अाहेत. अपघातासाठी खड्डे अाणि साइडपट्ट्या कारणीभूत ठरत असल्याने त्याकडे नागरिकांनी महामार्ग प्राधिकरणाचे लक्ष वेधले हाेते.

बुधवारी प्राधिकरणाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने शहरातील खड्डे बुजवण्यास प्रारंभ केला. खड्ड्यांपाठाेपाठ प्रमुख ठिकाणी साइडपट्ट्या दुरुस्त केल्या जाणार अाहेत. शिव काॅलनी- गुजराल पेट्राेलपंप परिसराला जाेडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलावरील खड्डे सकाळच्या वेळी बुजवण्यात अाले. अायटीअायसमाेर असलेला माेठा खड्डादेखील बुजवण्यात अाला. प्राधिकरणाच्या यंत्रणेकडून महामार्गाचे सर्वेक्षण करून खड्ड्यांचा शाेध घेण्यात अाला.

साइडपट्ट्या बुजवण्याची मागणी
शहरातील महामार्गावर खड्ड्यांची संख्या कमी असली, तरी साइडपट्ट्या सर्वत्र खाेल गेल्या अाहेत. अपघातांसाठी साइडपट्ट्या कारणीभूत ठरत असल्याने साइडपट्ट्या बुजवण्याची मागणी नागरिकांकडून हाेत अाहे. प्राधिकरणाने मात्र माेजक्याच ठिकाणी साइडपट्ट्या बुजवण्याचा पवित्रा घेतला अाहे
नवीन बसस्थानकात व्यापाऱ्याचा कांगावा
बनावट दागिन्यांचे पितळ उघडे पडणार हे लक्षात आल्यामुळे शैलेश हा जाना यांच्या ताब्यातून निसटला होता. तो बसस्थानकाच्या दिशेने पळाला. जाना यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्याचा पाठलाग सुरू केला. बसस्थानकावर शैलेश पुढे जाना इतर बंगाली कारागीर मागे असे चित्र होते. शैलेशने लगेच आरडाओरड सुरू केली. आपल्याला लुटत असल्याचा कांगावा केला हे पाहून परिसरातील रिक्षाचालक मदतीला धावले त्यांनी जाना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाच दटावणी आणि मारहाण करण्यास सुरुवात केली; परंतु शैलेशची चलाखी कळताच त्यांनी शैलेशला पकडून ठेवले आणि जिल्हापेठ पोलिसांना पाचारण केले. यानंतर बंगाली कामगार संघटनेचे सचिव महेंद्र माेहंती, शेखर गोपी कृष्ण हे पदाधिकारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अाले. सर्व प्रकार त्यांनी पोलिसांना समजवून सांगितला. इकडे, सोन्याचे दागिने घेऊन कारने पुढे निघालेल्या प्रकाश कुमावत तुषार शहाणे यांना शैलेश पुढे बसने रस्त्यात भेटणार होता. मात्र, भंडाफोड झाल्यानंतर पोलिसांनी प्रकाश तुषारला फोन करून बोलावून घेतले. अखेर रात्री उशिरापर्यंत त्या तिघांची चौकशी सुरू होती.
बातम्या आणखी आहेत...