आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यात वादळी वाऱ्यासह अर्धा तास धुवाधार पाऊस, मनपा प्रशासन पडले उडले; गटारीतील कचरा रस्त्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळ्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर असे पाणी साचले हाेते. - Divya Marathi
धुळ्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर असे पाणी साचले हाेते.
धुळे- धुळे शहरात शुक्रवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जाेरदार पाऊस झाला. या पावसामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली, विजेच्या तारा तुटल्या. वीजपुरवठा खंडित झाला. 
 
धुळे शहरात सकाळपासून तापमान वाढले हाेतेे. मात्र, संध्याकाळी वातावरणात बदल झाला. संध्याकाळी सहाच्या सुमारास जाेरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. १५ मिनिटे वादळी वारा सुरू हाेता. वादळी वाऱ्यामुळे शहर परिसरातील ५० पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले. त्यामुळे ताराही तुटून पडल्या. शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. चार गाड्या झाडांखाली दाबल्या गेल्या. बर्वे स्मृतीजवळ दाेन गाड्या दाबल्या गेल्या. तसेच जिल्हा परिषदेजवळ दाेन कार दाबल्या गेल्या. वादळी वारा सुरू असताना पाऊसही सुरू झाला. ३० मिनिटे धुवाधार पाऊस सुरू हाेता. या पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागले. अचानक अालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. 
 
वातावरणात गारवा 
धुळेशहरात तापमान ४३ अंशापर्यंत हाेते. यामुळे असह्य उकाडा हाेत हाेता. बेमाेसमी पावसामुळे मात्र वातावरणात गारवा निर्माण झाला. 
 
वीज पुरवठा खंडित 
धुळेशहरात वादळी वारा सुरू हाेताच वीजपुरवठा खंडित झाला. रात्री १० वाजता काही भागात वीज पुरवठा सुरू झाला. मात्र, अनेक भाग रात्री उशिरापर्यंत अंधारात हाेता. 
धुळ्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर असे पाणी साचले हाेते. 
 
वादळी वाऱ्याने वृक्ष उन्मळून पडली 
शहरात वैशाख वणव्यात सायंकाळी अर्धा तास अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली.अचानक अालेल्या पावसामुळे शहरातील शासकीय कार्यालय, रस्त्यालगत, शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील ५० पेक्षा अधिक वृक्ष मुळासह उन्मळून पडले. तसेच अनेक झाडांच्या माेठ्या फांद्या तुटून वाहनावर पडल्याने वाहने चेपली जाऊन नुकसान झाले. पावसामुळे अनेक रस्ते, खाेलगट भागात पाण्याचे छाेटे-छाेटे तळे निर्माण झाले हाेते. यातून वाहनधारकांना मार्ग काढताना कसरत करावी लागली. साक्री राेडवरील माेगलाई परिसरात काही घरांवरील पत्रे उडून घरात पावसाचे पाणी गेल्याने नुकसान झाले. काही क्षणांसाठी अालेल्या पावसाने माेठ्या प्रमाणावर नुकसान केले. 
 
शहरात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जाेरदार पावसाने हजेरी लावली. पाऊस, वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. तसेच माेठ्या झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर अाणि वीज वाहक तारांवर पडल्या हाेत्या. रस्त्यालगत असलेल्या झाडाखाली लावलेली वाहनेही वृक्ष,फांद्या पडून चेपल्या गेल्याने वाहनधारकांचे नुकसान झाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या दालनामागील स्वच्छता अाणि पाणीपुरवठा विभागासमाेरील माेठे झाडे पडल्याने त्याठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांच्या गाड्या अडकून पडल्यात. जिजामाता विद्यालयासमाेरील बर्वे वसतिगृहालगतचे दाेन माेठे वृक्ष पडल्याने त्याखाली स्काेडा(एमएचजी ०२-सीवाय ६४३७) अाणि दुसरी चारचाकी वाहन (क्र.एमएच १८-अेजे ६८३०) या दाेन्ही वाहनांचे टपाचे पाठीमागील भाग दाबला जाऊन नुकसान झाले. तर प्रबाेधनकार ठाकरे संकुलासमाेरील जुन्या बडाेदा बंॅकेसमाेरील माेठ्या िलंबूचा वृक्ष पडून त्याखाली एक दुचाकी दाबली जाऊन नुकसान झाले. याशिवाय शिवाजी राेडवरील ट्रॅव्हल्स पाॅइंट असलेल्या कालिका माता मंिदरासमाेरील वाळलेला माेठा वृक्ष, पंचमुखी हनुमान मंिदरासमाेरील भागातील नदीपात्रात असलेले तीन माेठे वृक्ष, स्वस्तिक चाैकातील बारी भवनाच्या शेजारी वृक्ष, जिजामातां विद्यालयालगत असलेल्या परिसरातील वृक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयातील वृक्षांच्या फांद्या, देवपुरातील जयहिंद हायस्कूलच्या अावारातील वृक्ष, इंदिरा गार्डन परिसर इतर भागातील वृक्षांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने रस्ते बंद झाले. 
 
पुढील स्लाइडवर वाचा,
- वादळी वाऱ्याने वृक्ष उन्मळून पडली 
- घराचे पत्रे उडाले, लग्नमंडपात सुदैवाने हानी टळली 
- मनपा प्रशासन पडले उडले; गटारीतील कचरा रस्त्यावर 
- उद्यादुपारपर्यंत वीजपुरवठा हाेणार सुरळीत 
-उकाड्याने नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा... ​
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...