आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘हास्य क्लब’मधून महिलांची आनंदी जीवनाकडे वाटचाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- हसणे आरोग्यासाठी उत्तम व्यायाम आहे. त्यामुळे सुदृढ आरोग्यासह आनंदी जीवनाचे धडे हास्य क्लबमधून महिला घेत आहेत. मनमोकळे हसून जीवनातील दु:ख, विचार, ताणतणाव बाहेर काढण्याचा प्रयत्न याद्वारे केला जात आहे. खान्देश सेंट्रल मॉलमधील हिरवळीच्या लॉनवर दररोज सकाळी व्यायाम करणाऱ्यांची गर्दी होत आहे.
याच हिरवळीवर उदयसिंग पाटील यांनी मोफत हास्य क्लब सुरू केला आहे. ७२ वर्षीय पाटील हे स्वत: महिलांना हास्याचे धडे देत असून चांगला प्रतिसाद मिळत आहे. खळखळून हसणे आजच्या जगात लुप्त झाले असून परत एकदा हसायला ते शिकवत आहेत. जेडीसीसी बँकेतून मॅनेजर म्हणून १५ वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. बहिणाबाई बगिच्यात व्यायाम करणाऱ्या समूहात ते हास्याचे प्रकार शिकले. आता इतरांनाही शिकवताहेत.
महिलांचा प्रतिसाद : गेल्या महिन्यापासून दररोज सकाळी वाजता हा संपूर्ण ग्रुप एकत्र येतो. व्यायाम करून नंतर हास्यवर्गाला सुरुवात होते. साधारण २० ते २५ महिलांचा समूह उपस्थित असतो. अनेक महिला ज्येष्ठ असून मधूमेह, थायरॉइडसारख्या आजारांनी देखील ग्रस्त आहेत. या हास्यातून आजारांवर चांगला परिणाम झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
वस चांगला जातो
दिवसभर आम्ही आनंदी असतो. अनेकदा चार जणात गेल्यावर किंवा आपण घरातही खूप मोठ्याने हसू शकत नाही. महिला तर मनमोकळे हसूच शकत नाही. या निमित्ताने महिलांना तरी मोकळे हसता येते. संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.
अर्चना पाटील
डायबिटीससाठी चांगला व्यायाम
डायबिटीसमुळे माझ्या तळहात पायांची आग व्हायची. परंतु आता पायी फिरणे आणि निखळ हसण्याने आरोग्यावर चांगला परिणाम झाला आहे. मला आता जास्त त्रासही जाणवत नाही. म्हणूनच व्यायाम डायबिटीससाठी उपयुक्त आहे.
शुभदा कुळकर्णी
हसून हसून लोटपोट
हास्याचा दरबार सकाळी भरल्यानंतर आसपास व्यायाम करणाऱ्या व्यक्तीदेखील हसायला लागतात. अनेक जण या हास्य क्लब आणि हास्य व्यायामाचे शूटिंगही करतात. सगळ्यांना जाेरजाेरात खळखळून आणि अनेक हावभावाने हसताना पाहून उपस्थित व्यक्तीला हसू आवरणे कठीण जाते. त्यामुळे अनेकांचा हा हास्यमय व्यायाम येथे होत आहे. येथे मौन हास्य, जोरात हसणे, हळू हसणे, बोलत बोलत हसणे, हात वर खाली करीत हसणे, सिंहाची मुद्रा करीत जीभ बाहेर काढून हसणे, असे प्रकार यात केले जातात.
बातम्या आणखी आहेत...