आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 मित्रांनी एकत्र येऊन सुरू केला ‘अाराेग्य अाधार प्रकल्प’; रक्त, लघवी चाचण्या सवलतीच्या दरात करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
जळगाव - शहरातील वकील, चार्टर्ड अकाउंटंट, व्यावसायिक, डाॅक्टर अशा विविध क्षेत्रातील ११ मित्रांनी एकत्र येऊन तळागाळातील लाेकांना अाराेग्य सेवेचा लाभ व्हावा, या उद्देशाने ‘अाराेग्य अाधार प्रकल्प’ तयार केला असून याद्वारे रक्त, लघवीच्या चाचण्या अत्यल्प दरात उपलब्ध करून दिल्या अाहेत. सामाजिक जाणिवेपोटी ११ मित्रांनी या प्रकल्पासाठी स्वत: अार्थिक याेगदान दिले अाहे. 
 
या प्रकल्पासाठी नवाेदय सेवा प्रतिष्ठान या धर्मादाय संस्थेची स्थापना करण्यात आली असून त्या माध्यमातून सेवाभावी संस्थेच्या अाराेग्य अाधार डायग्नाेस्टिक सेंटरद्वारे ही सेवा देण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल बियाणी, उपाध्यक्ष डाॅ. निखिल पाटील, किरण बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली. तळागाळातील गरीब गरजू लाेकांना अनेकदा बाहेर परवडत नाही त्यांच्यापर्यंत ही सुविधा पाेहचावी, जिल्हा रुग्णालयात जे काही उपलब्ध हाेते त्याच प्रकारे अामचाही हा प्रयत्न असून प्रत्येकदा शासन सगळ्यांपर्यंत सगळे पाेचवू शकत नाही तर अापण त्या लाेकांपर्यंत सुविधा पाेहचवण्याचे माध्यम व्हावे, या उद्देशाने हा प्रकल्प अाम्ही हाती घेतला अाहे,असे किरण बच्छाव यांनी या वेळी सांगितले. सोमवार, दि.१५ मे राेजी रिंगराेडवरील ललीत कला केंद्राजवळ सकाळी वाजता अाराेग्य अाधार प्रकल्पाचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर यांच्या हस्ते ज्येष्ठ पॅथाॅलाॅजिस्ट डाॅ.पी.एन.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हाेणार अाहे. 
 
अत्याधुनिक मशीन 
प्रकल्पांतर्गत एलईडी प्रकारातील अाधुनिक तंत्रज्ञान असलेले सगळे मशीन उपलब्ध करून देण्यात आले अाहे. जळगावात हाेणाऱ्या सगळ्या रक्त, लघवीच्या तपासण्या या ३० ते ५० टक्के सवलतीच्या दरात केल्या जातील. त्याचप्रमाणे ललीत कला भवन जवळील प्लाॅट.नं.३४ खान्देश मिल काॅलनी येथे हे केंद्र सुरू करण्यात अाले असून हा प्लाॅट अॅड. राहुल लाठी यांनी फक्त रुपया भाडेतत्वावर उपलब्ध करून दिला अाहे. 

लाख रुपयांचा निधी 
प्रतिष्ठानमध्ये निखिल बियाणी, डाॅ. निखिल पाटील, किरण बच्छाव, अॅड. राहुल लाठी, सचिव शैलेश राणे, डाॅ.नितीन चाैधरी, डाॅ. निरंजन चव्हाण, विनय बेंडाळे, कुमार वाणी, अॅड. राेहन बाहेती, राहुल बिर्ला यांचा समावेश अाहे. यामध्ये जवळपास ते लाख रुपयांचा निधी देऊन हा प्रकल्प या मित्रांनी उभारला अाहे. प्रत्येकाने अार्थिक याेगदान यामध्ये दिले अाहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...