आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात साफसफाईकडे दुर्लक्ष करणारा अकार्यक्षम आरोग्याधिकारी बडतर्फ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महासभेत प्रभारी आयुक्त किशोर राजेनिंबाळकर यांना जंतुनाशके दाखवताना कर्मचारी. - Divya Marathi
महासभेत प्रभारी आयुक्त किशोर राजेनिंबाळकर यांना जंतुनाशके दाखवताना कर्मचारी.
जळगाव - मान्यता घेताच लाखो रुपयांचे जंतुनाशकांची खरेदी केल्याने आणि शहरातील साफसफाईकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत अाराेग्याधिकारी डाॅ. विकास पाटील यांना तडकाफडकी बडतर्फ करण्याचा ठराव बुधवारी महासभेने केला. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सेवेतून काढत ‘घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात अाल्याने यंत्रणेत खळबळ उडाली. 

महापालिकेची विशेष महासभा बुधवारी दुपारी १२ वाजता झाली. महापाैर नितीन लढ्ढा अध्यक्षस्थानी हाेते. या वेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी तथा प्रभारी अायुक्त किशाेर राजेनिंबाळकर, उपमहापाैर ललित काेल्हे, नगरसचिव अनिल वानखेडे उपस्थित हाेते. 

शहरातील साफसफाई संदर्भात स्थायी समितीच्या सभेत नगरसेवक अनंत जाेशी यांनी थेट अाराेग्याधिकाऱ्यांचे पाय पकडले हाेते. त्यानंतरही त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा झाली नाही. तसेच शहरात डेंग्यू मलेरियाची साथ पसरण्याची भिती असतानाही साफसफाईकडे दुर्लक्ष केले. सफाई कामगारांकडून असिस्टंट कामगार ठेवले जातात. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही. पालिकेची आर्थिक स्थिती आणि गरज नसतानाही परवानगी घेता २३ लाखांच्या जंतुनाशकाची खरेदी केली. खरेदीनंतरही कार्योत्तर मंजुरी घेतली नाही आदी ठपके ठेवत आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांच्या कार्यमुक्तीचा ठराव महासभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यामुळे डाॅ. पाटील यांना थेट मनपाच्या सेवेतून काढण्याची कारवाई केली जाणार अाहे. कैलास साेनवणे, सभापती वर्षा खडके, रमेश जैन, रवींद्र पाटील यांच्यासह नगरसेवकांनी अाराेग्याधिकाऱ्यांच्या कारनाम्यांची जंत्री वाचून त्यांना सेवेतून काढण्याची मागणी केली. तसेच त्यांचा पदभार अभियंता उदय पाटील यांच्याकडे साेपवण्याचा निर्णयही घेतला. 
 
यामुळे झाली बडतर्फी 
- परवानगी घेता २३ लाखांच्या जंतुनाशकाची खरेदी केल्याचे उघड. 
- महासभा स्थायी समिती सभेत सातत्याने स्वच्छता मुद्द्यावर अाेरड. 
- शहरातील अस्वच्छतेवर शासनाच्या तपासणी समितीनेही अाेढले ताशेरे. 
- जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणीत अस्वच्छता अाढळली. 
- नागरिकांकडूनही साफसफाईच्या मुद्द्यांवर प्रचंड तक्रारी. 
- वॉर्डातील अस्वच्छतेमुळे नगरसेवकाने सभागृहात पकडले होते पाय. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, महासभेच्या ठरावानंतर पुढे काय ? 
बातम्या आणखी आहेत...