आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चैत्रामध्येच पेटला वैशाख वणवा; जळगाव @ ४५.३°...यामुळे वाढते उष्णता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तप्त उन्हात दुपारी वाजता प्रभात चौफुलीवर कार्य बजावताना वाहतूक पोलिस. - Divya Marathi
तप्त उन्हात दुपारी वाजता प्रभात चौफुलीवर कार्य बजावताना वाहतूक पोलिस.
जळगाव - उष्णतेच्या लाटेने जळगावकर हैराण झाले अाहेत. चैत्र महिन्यातच वैशाख वणवा पेटल्याच्या अनुभव नागरिकांना येत अाहे. सोमवारी तापमानाचा पारा ४५.३ अंशांपर्यंत पोहोचला हाेता. दिवसभर उन्हाच्या तीव्र झळा जाणवत हाेत्या. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट जाणवला. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा प्रसंग अाेढवू शकताे त्यामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे. 
 
गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. यंदा मार्च महिन्यातच मे हीट वैशाख वणव्याचा अनुभव नागरिकांना येत अाहे. मार्च महिन्यामध्ये ४० अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले होते. शुक्रवारी ४२.१, शनिवारी ४३.२, रविवारी ४४.३ सोमवारी ४४ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. आग ओकणाऱ्या सूर्याच्या उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. 
चैत्रातच प्रखर उन्हाचे चटके जाणवू लागल्याने कोरड पडणाऱ्या घशाला थंडावा देण्यासाठी थंड पेयांना मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच एसी, फ्रीज, कूलर, पंख्याची विक्री देखील वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या अतिउष्णतेचा परिणाम प्राण्यांवरही होताना दिसून येत आहे. 
 
उष्माघात कक्ष अद्ययावत ठेवण्याच्या सूचना 
- वाढत्या उष्णतेचा परिणाम जनजीवनावर होत असताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाता, अति थंडपेय टाळावे. लिंबू सरबत, कैरीचे पन्ह, दही याचे सेवन करावे. उष्णतेच्या वेेळेत घराबाहेर जाणे टाळावे. उष्माघाताचे प्रमाण वाढू नये, यासाठी सर्व जिल्हा रुग्णालय, आरोग्य केंद्रांना उष्माघात कक्ष अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- बी.अार. पाटील, प्रभारी, जिल्हा आरोग्य अधिकारी 
 
पुढील स्लाईडवर वाचा, ...यामुळे वाढते उष्णता
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...