आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिला पती असताना दुसऱ्याशी केला घराेबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - पहिला पती हयात असताना दुसऱ्याशी लग्न करून फसवणूक केली. तसेच दुसरा पती नातेवाइकांच्या मदतीने पहिल्या पतीला दमदाटी करून, त्याच्या घरातील साहित्याची ताेडफाेड करून घरातून अाठ हजार रुपये लुटून नेल्याचा प्रकार शिरपूर शहरातील क्रांतीनगरात घडला. याबाबत पत्नीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे 
 
शिरपूर शहरातील क्रांतीनगरात राहणारे दीपक संताेष शिरसाठ (३०) यांचा विवाह अाशाबाई दीपक िशरसाठ यांच्याशी झाला हाेता. पती हयात असताना अाशाबाईने रवींद्र मगन पाटील याच्याशी फेब्रुवारी २०१७ राेजी विवाह करीत त्यांची फसवणूक केली. तसेच २० मार्च राेजी सकाळी वाजता वाडी येथे दीपक शिरसाठ यांना अाशाबाई शिरसाठ, रवींद्र मगन पाटील, कमलाबाई मगन पाटील, मगन सुका पाटील यांनी शिवीगाळ, दमदाटी केली. यासह शिरपूर येथील क्रांतीनगरातील चाैघांसह हिंमत दीपचंद्र पाटील, हिराबाई हिंमत पाटील, सुनील पंडित पाटील, साेनीबाई सुनील पाटील, गाेटू देविदास पाटील (सर्व रा.करवंद, ता.शिरपूर) यांनी दीपक यांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच घरातील साहित्याची ताेडफाेड करीत दहा हजार रुपयांचे नुकसान केले. या वेळी संबंधितांनी घरातील डब्यातील अाठ हजार रुपये लुटून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
याबाबत दीपक शिरसाठ यांनी न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला हाेता. त्यांच्या तक्रारीवरून न्यायालयाने पाेलिसांत गुन्हा दाखल करण्याची सूचना दिली. दीपक शिरसाठ यांच्या तक्रारीवरून या नऊ जणांविरुद्ध शिरपूर शहर पाेलिस स्टेशनमध्ये भादंवि कलम ४९४, ४२७, ४९८-अ, ३९५, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६, ३४नुसार गुन्हा दाखल करण्यात अाला असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तपास सहायक पाेलिस निरीक्षक एस.बी.वाघ करीत अाहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...