आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: अतिक्रमण अधीक्षकांनीच केले घराबाहेर ‘अतिक्रमण’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापालिकेत ठिय्या आंदोलन करताना तक्रारदार. - Divya Marathi
महापालिकेत ठिय्या आंदोलन करताना तक्रारदार.
जळगाव - शहरातील मार्केट, रस्ते, अनधिकृत रहिवासी बांधकाम काढण्याची कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधीक्षकांसह चौघांनी अनधिकृतरीत्या बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. याविरोधात गेल्या पाच वर्षांपासून वारंवार तक्रार करूनही महापालिकेकडून कारवाई होत नसल्याने अखेर तक्रारदारांनी शनिवारी सहायक नगररचनाकारांच्या दालनाबाहेर सायंकाळी तास ठिय्या आंदोलन केले. यामुळे नगररचनाकारांची दमछाक झाली. दोन दिवसांत पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आश्वासन मिळाल्याने तक्रारदारांनी आंदोलन मागे घेतले. 
 
मेहरूण परिसरातील अक्सानगर, बौद्धवाडा येथील गावठाण परिसरात राहणारे महापालिकेचे अतिक्रमण अधीक्षक एच.एम. खान यांनीच स्वत:च्या घराजवळ सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी त्यांनी पत्र्यांच्या तीन-चार खोल्या बांधून त्या भाड्याने दिल्या आहेत. 
 
शेड अतिक्रमणात; बांधकाम नाही 
- घराचे बांधकाम करताना साहित्य ठेवण्यासाठी एक शेड बांधले होते. हे शेड अनधिकृत आहे. मी ते काढून घेणार आहे; पण याशिवाय कोणतेही बांधकाम अनधिकृत किंवा अतिक्रमण केलेले नाही. बांधकाम केलेली ती जागा माझीच आहे. अनधिकृत असल्याचे सिद्ध केल्यास तेही काढून टाकेन. एच.एम.खान,अधीक्षक, अतिक्रमण विभाग 
 
पाठीशी घातले जाणार नाही 
अनधिकृत बांधकामाची तक्रार असल्यास संबंधित विभागाकडून पाहणी केली जाईल. त्यात बेकायदेशीर बाबी आढळल्यास सुरुवातीला नोटीस दिली जाईल त्यानंतर थेट कारवाई करण्यात येईल. कारवाईसंदर्भात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.
जीवनसोनवणे, आयुक्त, महापालिका 
 
पाइपलाइनही मिळवली 
बेकायदेशीर बांधकाम केलेल्या जागेवर महापालिकेची इंच व्यासाची पाइपलाइनही संबंधितांनी मिळवली आहे. जागेच्या नकाशाबाबतही काही प्रमाणात घोळ करण्यात आला आहे, अशी तक्रार यापूर्वी प्रभागातील नगरसेविका सुभद्रा नाईक इकबाल पिरजादे यांच्याकडे केली असल्याचे तक्रारदारांनी म्हटले. 
 
बातम्या आणखी आहेत...