Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» News About Illegal Liquor Sale; 35 Cases Filed Against Him

अवैध मद्यविक्रीवर धाड; 35 जणांवर गुन्हे दाखल, संशयितांकडून लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी | Apr 21, 2017, 08:35 AM IST

  • अवैध मद्यविक्रीवर धाड; 35 जणांवर गुन्हे दाखल, संशयितांकडून लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त
जळगाव-महामार्गावरील ५०० मीटरवर मद्य विक्रीला न्यायालयाच्या अादेशानंतर बंदी घालण्यात अाली अाहे. त्यामुळे अवैध मद्यविक्री वाढल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी एकाच दिवसात कारवाई करीत ३५ जणांवर गुन्हे दाखल करत जणांना अटक केली. त्यांच्याकडून दारू, वाहनांसह लाख ६८ हजार ४२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
महामार्गावरील दारूबंदीनंतर जिल्ह्यात अवैध दारू विक्री वाढली आहे. त्यावर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईसाठी टीम तयार केल्या अाहेत. गुरुवारी जिल्हाभरात धाडसत्र सुरू केले. यात शिरसाेली येथून शिवदास खलसे, वावडदा येथून सुमनबाई गाेपाळ, पाराेळा येथून साहेबराव अाजगे, चेतन साेनवणे, भालाेद येथून अात्माराम काेळी, भुसावळ येथून अजय सागरे, खेडी जळगाव येथून मनाेज पाटील यांना अटक केली अाहे.

विभागीय निरीक्षक सी. पी. निकम, भुसावळ येथील निरीक्षक ए. बी. पवार, चाळीसगावचे अार. एस साेनवणे, भरारी पथकाचे संजय काेऱ्हे, मुक्ताईनगरचे बी. बी. देवकाते, दुय्यम निबंधक सी. एच. पाटील, एल. व्ही. पाटील, एम. बी. साेनार, जी. जी. अहिरराव, जी. बी. इंगळे, एम. पी. पवार यांच्या पथकाने कारवाई केली. यात ३५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात अाले असून जणांना अटक केली आहे. जिल्हाभरात ही धडक माेहीम सुरू राहणार असल्याचे राज्य उत्पादन विभागातर्फे सांगण्यात अाले.
जप्त साठा असा : अटककेलेल्या व्यक्तींकडून ३०१ लिटर हातभट्टी दारू, १७०२० रुपयांचे दारूचे रसायन, १६ लिटर देशीदारू, १३ लिटर विदेशी दारू जप्त केली अाहे.

Next Article

Recommended