आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ: देहव्यापाराची पाळेमुळे रुजली; आठ वर्षांत तिसऱ्यांदा कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैतागवाडीत झालेल्या कारवाईत अटक करण्यात आलेले संशयित. - Divya Marathi
वैतागवाडीत झालेल्या कारवाईत अटक करण्यात आलेले संशयित.
भुसावळ - शहरात गेल्या अाठ वर्षात ‘पीटा’ (प्रिव्हेंन्शन ऑफ इमॉरल ट्रॅफिकिंग अॅक्ट) (अनैतिक व्यापार प्रतिबंध अधियनियम) या कायद्यानुसार तीनवेळा कारवाई झाली. सोमवारी सायंकाळी वैतागवाडी भागात झालेल्या कारवाईमुळे भुसावळचे नाव राज्यभरात गाजले. वैतागवाडी भागात यापुर्वी २०११ आणि २०१५ मध्ये पीटा कायद्यानुसार कारवाई झाली होती. मात्र, देहव्यापाराची भुसावळात रुजलेली पाळेमुळे खोदून काढण्यात पोलिस यंत्रणेला अपयश आल्याने अनैतिक देहव्यापार सुरूच असल्याचे सोमवारी झालेल्या कारवाईमुळे समोर आले. अटकेतील सर्व २३ संशयितांना न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. 
 
वैतागवाडी भागात तत्कालीन सहायक पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांच्या काळात २०११ मध्ये पीटा कायद्याअंतर्गत कारवाई झाली हाेती. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक राेहिदास पवार यांच्या कार्यकाळात २०१५ मध्ये दुसऱ्यांदा अशी कारवाई झाली. तरीदेखील अनैतिक देहव्यापाराची पाळेमुळे खोदून काढण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरल्याने सोमवारी (दि.२४) सहायक पोलिस अधीक्षक नीलाेत्पल यांनी तिसरी कारवाई केली. भुसावळातील वैतागवाडी भागात नेपाळच्या सीमेवरून महिला देह व्यापारासाठी येतात. तसेच राजस्थानसह अन्य भागातील महिलांचा यात समावेश असतो. त्यामुळे वैतागवाडी गुन्हेगारांचे अाश्रयस्थान निर्माण झाले. देहव्यापार करणाऱ्यांमध्ये पाच अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याचे सोमवारच्या कारवाईत समोर आले. अद्यापही या प्रकरणातील संशयित शेख चांद शेख हमीद, शेख रफिक शेख शब्बीर, शेख माेहम्मद उर्फ चिन्न शेख हसन कमल अतुल पाल यांना अटक झालेली नाही. त्यामुळे देहव्यापाराची पाळेमुळे खोदून पोलिसांनी सूत्रधारांना गजाआड करणे आवश्यक आहे. 
 
यांना केली अटक : सोमवारी २७ महिला अल्पवयीन मुली अशा ३२ महिलांची देहव्यापारातून सुटका करून जळगावच्या अाशादीप महिला सुधारगृहात रवानगी केली. तसेच कारवाईत मीराबाई सुरेश सूर्यवंशी, सलमाबी रफीक शेख, अारिफा जुबेर शेख, चाँद शेख महम्मद (वय २३, रा. जाम माेहल्ला, भुसावळ), चिराग माेहम्मद फकीर (वय २७,रा. दीनदयालनगर), संजय तायडे (वय २६, रा.गणेशनगर, जामनेर), दीपक वाजपेय (वय २६), शे. अख्तर शेख शे. अजगर(वय २८), कमलेश रामलाल चाैधरी (वय २३), गुड्डू ढाेले (वय १९), जिसन नेमाळकर (वय २०), मयूर महाजन (वय १९, रा. बऱ्हाणपूर), खुशाल मराठे (वय२१), नीलेश चाैधरी (वय २१), अाकाश बागडे (वय २३, सर्व रा. रामेश्वर काॅलनी, जळगाव), शंकर मुरलीधर हिरडकर (वय २७, रा. हिवरा, ता. मलकापूर), मयूर पंचाेली (वय २४, शेगाव), दिनेश राजू चव्हाण, विनाेद माेरसिंग चव्हाण (वय ३०, दोघे.रा.नांद्रा तांडा, साेयगाव), जमुनाप्रसाद चापरे (वय ३९,लाेकाेशेड, भुसावळ), सुरेश बेडवा (वय ३६) अमाेल वंजारी (वय २४, रा. वरणगाव) यांना कारवाईत अटक झाली. 
 
विशीतील युवक 
आरोपींमध्येचक्क विशीच्या आतील युवकांचादेखील समावेश आहे. आरोपींमध्ये जामनेर, भुसावळ, बऱ्हाणपूर, जळगाव, मलकापूर तालुका, वरणगाव येथील युवकांचा समावेश अाहे. 
 
न्यायालयीन कोठडीत रवानगी 
सर्व २३ संशयिताना मंगळवारी जळगाव कारागृहातून भुसावळ येथील न्यायायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश पी.बी.तौर यांनी सर्वांना न्यायालयीन काेठडी सुनावली. सर्व संशयितांना अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करावा लागणार अाहे. पाेलिसांतर्फे तपासाधिकारी तथा पाेलिस निरीक्षक चंद्रकांत सराेदे यांनी बाजू मांडली. चोख बंदाेबस्त ठेवण्यात अाला. 
 
पथक तयार केले 
- या प्रकरणातील चार प्रमुख अाराेपींना अटक करण्यासाठी पाेलिसांचे पथक तयार करण्यात अाले अाहे. लवकरच चारही जणांना अटक केली जाईल. वैतागवाडीत अवैध प्रकार चालू देणार नाही. पालकांनीदेखील मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या पाल्यांच्या हालचालींवर नजर ठेवावी. नीलाेत्पल,सहायक पाेलिस अधीक्षक 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...