आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झिंगाट पोलिस अधिकाऱ्यासह रायटरचा हॉटेलमध्ये धिंगाणा, तरुणांमध्ये वाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हापेठ पोलिस ठाण्यासमोर असलेल्या हॉटेलमध्ये बसण्यावरून दोन तरुणांमध्ये बिनसले. त्यांच्यात शाब्दिक चकमक सुरू असताना तेथे उपस्थित असलेल्या रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या झिंगाट अधिकाऱ्यांसह त्यांच्या रायटरने चांगलाच धिंगाणा घातल्याचा प्रकार रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडला. या वेळी त्यांची पोलिसगिरी वाढतच गेल्याने तरुणांनीही त्यांना प्रतिकार केल्याने दोघांमधील वाद अधिच वाढला. शेवटी पोलिसांच्या मध्यस्थीने पडदा टाकण्यात आला.
रामानंदनगर पोलिस ठाण्यातील अधिकारी त्यांच्या रायटरसोबत मद्यपान आणि जेवणासाठी हॉटेलमध्ये आले होते. तेथे दोन मित्रांमध्ये टेबलावर बसण्यावरून शाब्दिक चकमक उडाली. या वेळी त्यांच्या टेबलाशेजारी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अधिकाऱ्याने दोन्ही तरुणांना पोलिसगिरी दाखवण्यास सुरुवात केली. त्यामुळे तरुणांनी पोलिस अधिकारी कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली. तर संतापात अधिकाऱ्याने दोन्ही तरुणांची कॉलर धरली. त्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. या वेळी गस्तीवर असलेले जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांना पाहून पोलिस अधिकाऱ्याची मुजोरी अधिकच वाढली, तर समोर आपलाच अधिकारी असल्याने जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी त्यांना काहीच बोलत नव्हते. एकाने हिंमत करून अधिकाऱ्याला समजवले.

कारवाईच्या मागणीसाठी तरुणांचा गोंधळ
तरुणांनीत्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी लावून धरत गोंधळ घातला. त्यामुळे तरुणांना जिल्हापेठ पोलिस ठाण्यामध्ये आणण्यात आले. मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी दोघांची समजूत काढली. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...