आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : निनावी तक्रारीवरून चार वर्षे चौकशी; निवृत्त भांडारपालसह कुटुंबावर गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
जळगाव - गिरणा पाटबंधारे विभागातून भांडारपाल म्हणून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याकडे तब्बल २० लाख रुपयांची अपसंपदा आढळून आल्यामुळे त्याच्यासह पत्नी मुलावर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार वर्षांपूर्वी जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या एका निनावी तक्रार अर्जावरून संबंधित कर्मचाऱ्याची चौकशी सुरू होती. 

भगवान पुंजाजी बोदडे (वय ६२, रा.वाघनगर) यांनी मार्च १९८०पासून पाटबंधारे विभागात विविध पदांवर काम केले आहे. भांडारपाल म्हणून ते ३० जून २०१५ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. ३५ वर्षांच्या सेवाकाळात त्यांच्या नावावर एकूण २९ लाख ९३ हजार ४७६ रुपयांची मालमत्ता आढळून आली आहे. २३ मे २०१३ रोजी एसीबीकडे बोदडेंच्या विरोधात एक तक्रार अर्ज आला होता. बोदडे यांनी पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार करीत अनेक ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्याचे अर्जात म्हटले होते. तसेच या अर्जाच्या सोबत बोदडेंनी खरेदी केेलेल्या काही मालमत्तांचे पुरावेदेखील जोडण्यात आले होते. हा अर्ज मिळाल्यानंतर सुरुवातीला तो नाशिक येथे वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आला. तेथून परवानगी मिळताच मे २०१३पासून त्याची चौकशी सुरू करण्यात आली होती. बोदडे रुजू झाल्यापासूनचे रेकॉर्ड एसीबीने तपासण्यासाठी घेतले. त्यांना शासनाकडून दिले जाणारे वेतन, उदरनिर्वाहाचा खर्च, वडिलोपार्जित मालमत्ता अशा अनेक बाबी तपासण्यासाठी एसीबीने तब्बल चार वर्षे वेळ घेतला. सन २००८मध्ये बोदडेंनी खरेदी केलेल्या जमिनींच्या बाबतीतील संशय बळावला. तसेच त्यासंदर्भात बोदडेंना विचारणा करण्यात आल्यानंतर समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. याच आधारावर ३१ डिसेंबर २००८ या तारखेपर्यंतचे रेकॉर्ड तपासण्यात आले. 

या कालावधीत बोदडे यांच्याकडे २० लाख २७ हजार १६६ रुपयांची अपसंपदा असल्याचे निष्कर्ष चौकशीतून समोर आले. त्यानुसार एसीबीचे डीवायएसपी पराग सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोदडे यांच्यासह त्यांच्या पत्नी अलका मुलगा दिलीप या तिघांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात संशयितास अटक करण्याची गरज नसल्यामुळे थेट दोषारोप सादर करण्यात येईल. 

या कलमान्वये गुन्हा दाखल 
तिघांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात भादंवि कलम १०९ तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सन १९८८चे कलम १३ (१)(ई)सह १३ (२)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एकाच दिवशी पाच जमिनींची खरेदी 
1) बोदडे हे रुजू झाल्या-पासूनच्या इन्कमची तपासणी एसीबीने केली. १५ मे २००८ रोजी बोदडे यांनी पत्नी, दोन मुले स्वत:च्या नावावर विटनेर (ता.जळगाव) येथे पाच वेगवेगळ्या शेतजमिनी खरेदी केल्या. 
 
2) विशेष म्हणजे, यातील लाख ७५ हजार रुपयांची हेक्टर ३२ आर क्षेत्रफळाची जमीन त्यांनी त्यांच्या आठ वर्षांच्या मुलाच्या नावावर खरेदी केली होती. 
 
3) तसेच हेक्टर ८२ आर ही लाख ९० हजार रुपयांची जमीन स्वत:च्या नावावर, हेक्टर ८१ आर ही लाख ६७ हजार रुपयांची तसेच हेक्टर ७३ आर ही लाख ५१ हजार रुपयांची अशा दोन जमिनी पत्नीच्या नावे आणि हेक्टर ७३ आर ही लाख ५१ हजार रुपयांची जमीन मोठ्या मुलाच्या नावावर खरेदी केली होती. 
 
4) एकाच दिवशी २५ लाख ३४ हजार रुपयांच्या जमिनी बोदडेंनी खरेदी केल्याचे एसीबीच्या तपासात उघड झाले. याच व्यवहारामुळे बोदडेंवर संशय बळावला असून, त्याचा हिशेब त्यांना देता आलेला नाही. 
 
खोटी माहिती दिली 
एकाच दिवशी खरेदी झालेल्या जमिनींसाठी पैसे कोठून आणले? या प्रश्नाचे खोटे उत्तर बोदडेंनी दिल्याचे चौकशीत समोर आले आहे. एका सेवानिवृत्त झालेल्या नातेवाइकाने जमिनी खरेदीसाठी पैसे दिल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्यांनी सांगितलेले नातेवाईक हे जमिनी खरेदी केल्याच्या तीन महिन्यांनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे हे पैसे भ्रष्टाचार गैरमार्गाने आल्याचा निष्कर्ष एसीबीने काढला आहे. 
 
अशी आहे शिक्षेची तरतूद 
बोदडे यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सन १९८८चे कलम १३ (१)(ई)सह १३ (२)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात गुन्हा सिद्ध झाल्यास महिने ते वर्षांपर्यंत कारावास दंडाची शिक्षा हाेऊ शकते. 
 
बाजू मांडण्याची संधी 
अशा प्रकारच्या गुन्ह्यांची चौकशी बरीच वर्षे सुरू असते. यात सीए, आर्थिक गुन्हे शाखेच्या मदतीने संबंधित कर्मचाऱ्याच्या उत्पन्नाची चौकशी केली जाते. चौकशीदरम्यान संबंधिताला बाजू मांडण्याचीही पुरेशी संधी दिली जाते. अपसंपदा असल्याचा संशय आल्यास पैसे कोठून आणले? याचे पुरावे वेळोवेळी मागितले जातात. त्यात असमाधानकारक उत्तर मिळाले तसेच तज्ज्ञांकडून झालेल्या चौकशीत संबंधित व्यक्ती दोषी आढळून आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो. 
 
- एसीबीने सीए, आर्थिक गुन्हे शाखेच्या मदतीने केली पडताळणी; २० लाखांची अपसंपदा जमवल्याचे उघड
- सेवेत असतानाचे तब्बल १८ वर्षांचे रेकॉर्ड तपासले; आठ वर्षांच्या मुलाच्या नावे देखील खरेदी केली जमीन 
बातम्या आणखी आहेत...