आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेत वाढ, लैंगिक शिक्षणावर कार्यक्रम; डॉ. मुठे यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लैंगिक शिक्षणावरील कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. विजेयश्री मुठे. - Divya Marathi
लैंगिक शिक्षणावरील कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. विजेयश्री मुठे.
जळगाव - लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. मात्र, भीतीपोटी अशा घटना उघडकीस येत नसल्याचे मत डॉ. विजेयश्री मुठे यांनी व्यक्त केले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयाच्या मानसोपचार विभागातर्फे नुकतीच बाल लैंगिक शिक्षणावर कार्यशाळा घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
 
या कार्यशाळेत डॉ. मयूर मुठे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील, अधिष्ठाता डॉ. एन. एस. आर्विकर, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनिता नागरगोजे, डॉ. रजनीकांत, बालरोगतज्ज्ञ डॉ. पराग महानकर, डॉ. अभिजित देशमुख, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरुड, गोदावरी सीबीएसई स्कूलच्या प्राचार्या नीलिमा चौधरी, डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कूल भुसावळच्या प्राचार्या अनघा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 
या प्रसंगी डॉ. मुठे यांनी चित्रफितीद्वारे माहिती दिली. बालकांवरील लैंगिक अत्याचाराला परिवार, नातेवाईक समाज जबाबदार आहे. अत्याचार कोण कशाप्रकारे करतो तसेच त्यांना प्रोत्साहन कसे मिळते, याबाबतही त्यांनी माहिती दिली. माजी खासदार डॉ. पाटील यांनी आपल्या पाल्याच्या भावना समजावून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आई-वडील शिक्षकांनी दुर्लक्ष करता समस्यांवर उपाय शोधणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ. मयूर मुठे यांनी मानसिकता बदलली, तर ही समस्या आपण मुळापासून काढून टाकू शकतो. लैंगिक शिक्षण म्हणजे बिभत्सता असे नव्हे तर शरीरातील बदल त्याबाबत अनभिज्ञ असलेल्या मुलींना ही नैसर्गिक प्रक्रिया असून यावर उपाय पालकांनी सुचवले पाहिजे, असे सांगितले. या कार्यशाळेत १२५च्या वर शिक्षक डॉक्टरांनी सहभाग नोंदवला. डॉ. रजनी कांत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...