आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रध्वजाचा मान प्रत्येकाने राखावा, शहरात राष्ट्रसेवा दलातर्फे उद्या मध्यरात्री झेंडावंदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांनी केले आहे. 
 
स्वातंत्र्यादिनी राष्ट्रध्वजाविषयी असलेले प्रेम, निष्ठा, अभिमान दर्शविण्यासाठी अनेक जण वैयक्तिकरीत्या छोट्या आकारातील राष्ट्रध्वजाचा कार्यक्रमामध्ये वापर करतात. कार्यक्रमानंतर राष्ट्रध्वज काही वेळा रस्त्याच्या कडेला किंवा इतर ठिकाणी पडलेले आढळतात. राष्ट्रध्वजाचा वापर केल्यानंतर त्याचा योग्य तो मान राहील याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. राष्ट्रध्वज खराब झालेले असतील, तर त्यांचा योग्य तो मान राखून ते ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करावेत. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांनी केले. 
 
उद्या बालचित्रकला स्पर्धा 
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या अार.अार. पाडवी नूतन विद्यालयात साेमवारी (दि.१४) सकाळी १० वाजता चित्रकला स्पर्धा हाेणार अाहे. ही स्पर्धा चार गटात हाेणार असून, सात वर्षांपर्यंतचा गट, ते वर्षे, ते १२ वर्षे अाणि १२ ते १६ वर्षे या गटाचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी बी.सी.पाटील, गणेश पाटील यांच्याशी पाडवी नूतन विद्यालयात संपर्क साधावा. स्पर्धकांना ११ इंच बाय १५ इंच अाकाराचा ड्राॅइंग पेपर देण्यात येईल. स्पर्धेसाठी लागणारे साहित्य, रंग स्पर्धकाला अाणावे लागतील, अशी माहिती गटशिक्षाणाधिकारी सुरेखा देवरे, संयाेजक शाळेचे प्राचार्य एन.बी.पाटील यांनी दिली. 
 
राष्ट्रसेवा दलातर्फे १४ ऑगस्टला मध्यरात्री १२ वाजता महाराणा प्रताप चौकात बापू ठाकूर, बी.सी. महाले डॉ.अभिनव दरवडे यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतमातेला वंदन करून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रसेवा दलातर्फे मध्यरात्री झेंडावंदन करण्यात येते. त्यानुसार यंदाही हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी देशभक्तीपर गीते सेवा दल गीते, पोवाडे आदी सादर करण्यात येतील. कार्यक्रमाला राष्ट्रसेवा दलाच्या सैनिकांसह समविचारी संघटना, युवक देशभक्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य कार्यकारिणी सदस्य अॅड. मिलिंद बोरसे, राष्ट्रसेवा दल महानगर कार्याध्यक्ष नितीन माने, जिल्हा संघटक रमेश पवार महानगर संघटक रमेश सावंत यांनी केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...