आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोभनीय: केंद्रीय उपसंचालकांसमाेरच शाैचाला जाणाऱ्या महिला, मुलांचा आला जथ्था

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हातात लहान बकेट घेऊन नागरिक मुले असे रस्त्यावर अाले. - Divya Marathi
हातात लहान बकेट घेऊन नागरिक मुले असे रस्त्यावर अाले.
धुळे - शहरातील स्वच्छतेची पाहणी करायला अालेल्या केंद्रीय उपसंचालक व्ही. अार. रमणा यांच्यासमाेरच लहान बकेट डब्यांमध्ये पाणी घेऊन शाैचाला जाणाऱ्या महिला मुलांचा ज‌थ्था धडकला. पांझरा नदीकिनारी ही घटना घडली. या डबेधारी नागरिकांनी उघड्यावर शाैचास जाण्याची कैफियत मांडण्यासाठी उपसंचालकांचे वाहनही अडविण्याचा पवित्रा घेतला. अचानक आलेल्या या नागरिकांना पाहून स्वच्छतेचा ढोल पिटणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांची पंचाईत झाली. चालकाला सूचना देऊन त्यांनी वाहन पिटाळण्यास सांगितले. पाण्याचे डबे घेऊन आलेल्या नागरिकांनी वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता दुचाकीवरील मनपा कर्मचाऱ्यांनी त्यांना आवाज देऊन थांबविले; परंतु नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. या वेळी उपसंचालक रमणा यांनी नागरिकांना पाहून वाहनात बसलेले अधिकारी जाधव कांबळे यांना विचारणाही केली; परंतु तोपर्यंत चालकाने वाहन सुसाट नेले. 
 
हगणदारी मुक्तीचा २३ जानेवारीपासून गवगवा करणाऱ्या महापालिकेत मंगळवारी सकाळी स्वच्छतेची आढावा बैठक झाली. आयुक्त संगीता धायगुडे, उपायुक्त रवींद्र जाधव, अभिजित कदम, त्र्यंबक कांबळे, तुरे, अभियंता कैलास शिंदे, चंद्रकांत उगले, रत्नाकर माळी यांच्यासह स्वच्छता विभागाचे निरीक्षकही हजर होते; परंतु बैठकीच्या वेळीच सादर केली जाणारी कागदोपत्री आकडेवारी, केंद्रीय उपसंचालक एसव्हीआर रमणा यांच्या लक्षात आली. त्यामुळे सकाळी झालेल्या बैठकीत त्यांनी फारशी माहिती जाणून घेण्यास रस दाखवला नाही. यानंतर उन्हाचा तडाखा कमी झाल्यावर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उपसंचालक श्रीमती रमणा स्वच्छतागृहांची पाहणी करण्यासाठी विश्रामगृहाबाहेर पडल्या. त्यांच्या वाहनात उपायुक्त जाधव, कांबळे हे होते; परंतु या वेळी उपसंचालक श्रीमती रमणा यांचा कल बदललेला दिसून आला. गुलमोहाेर विश्रामगृह, शहर पोलिस ठाणे तसेच ट्रॅव्हल्स पाॅइंट जवळ असलेल्या स्वच्छतागृहाची श्रीमती रमणा यांनी पाहणी केली. या वेळी उपायुक्त जाधव कांबळे यांनी पाहणी दौऱ्यात नसतानाही श्रीमती रमणा यांना पांझरा किनारी असलेल्या उत्तमराव पाटील यांच्या स्मारकाजवळ पाहणीसाठी नेले. याच ठिकाणी मनपाचा बेत उलटला. रोपट्यांची पाहणी समोर असलेल्या घराची पाहणी हाेत असताना रमाबाई आंबेडकर नगरमधील अनेक महिला-पुरुष लहान मुले हाती पाण्याचे डबे घेऊन चालून आले. शौचालयाअभावी उघड्यावर बसावे लागत असल्याचे वास्तव श्रीमती रमणा यांना सांगण्याचा प्रयत्न केला. अचानक आलेल्या नागरिकांना पाहून स्वच्छतेचा ढोल पिटणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांची पंचाईत झाली. चालकाला सूचना देऊन त्यांनी वाहन पिटाळण्यास सांगितले. पाण्याचे डबे घेऊन आलेल्या नागरिकांनी वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता दुचाकीवर असलेल्या काही मनपा कर्मचाऱ्यांनी त्यांना आवाज देऊन थांबविले; परंतु नागरिक ऐकण्याच्या तयारीत नव्हते. या वेळी उपसंचालक रमणा यांनी नागरिकांना पाहून वाहनात बसलेले अधिकारी जाधव कांबळे यांना काहीतरी विचारणाही केली; परंतु तोपर्यंत चालकाने वाहन सुसाट नेले. सायंकाळचे चित्र पाहून श्रीमती रमणा यांचा मूड पुन्हा सकाळप्रमाणे बदलल्याचे जाणवले. 
 
मुद्दामुख्यमंत्र्यांपासून केंद्रापर्यंत 
रमबाई आंबेडकर नगरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून येथे स्थायिक आहेत. मनपाकडून लावण्यात येणारे करही ते भरतात; परंतु काही दिवसांपूर्वी अतिक्रमण मोहीम राबवून परिसरात शासकीय निधीतून बांधलेले ४० सीटचे महिला-पुरुषांचे स्वच्छतागृह पाडण्यात आले. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात सभेसाठी धुळयात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागरिकांनी निवेदन देऊन कैफियत मांडली. याच परिस्थितीचे श्रीमती रमणा यांना कथन करायचे होते. 
 
आयुक्तांचे ‘प्लीज गाइड अस’ 
बैठकीच्या सुरुवातीचा काही क्षण सत्कारासाठी देण्यात आला. या वेळी आयुक्त संगीता धायगुडे यांनी स्वच्छतेसंदर्भातील दाव्यांवर दावे त्याची आकडेवारी श्रीमती रमणा यांच्यासमोर मांडली. एवढे होऊनही शहर किती स्वच्छ आहे. याचाच खटाटोप आयुक्त धायगुडे करत होत्या; परंतु त्यांच्या या मताला बहुधा उपसंचालक रमणा यांनी गांभीर्याने घेतले नाही. आपल्या म्हणण्याकडे लक्ष वेधण्यासाठी चेहऱ्यावर हास्य आणत आयुक्त श्रीमती धायगुडे यांनी अखेर ‘प्लीज गाइड अस’ असा शब्द वापरून विराम दिला; परंतु हा केवळ खटाटोप ठरला. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, ‘आता रांगोळी घ्या टाकून...’ 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...