आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातिभेदाच्या भिंतींना झुगारून पिंपळनेरला आंतरजातीय विवाह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपळनेर- जात पात मानता येथील सुवर्णकार समाजातील कुणाल दुसाने याने अनुसूचित जातीतील देवयानी शिंदेशी विवाह केला. येथील महावीर भवनात दोन दिवसांपूर्वी हा विवाह साेहळा झाला. नवदांपत्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे सत्कार करण्यात आला. 
 
येथील अहिर सुवर्णकार समाजाचे सोमनाथ झिंगूशेठ दुसाने यांचा मुलगा कुणाल शिवणकाम व्यवसाय पतसंस्थेचे कलेक्शन करतो. त्याने सत्यशोधक विचारांनी प्रेरित हाेऊन आंतरजातीय विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्याने आई-वडिलांची परवानगी घेतली. वहिनी कावेरी भाऊ ललित दुसाने हे त्याच्या पाठीशी उभे राहिले. 
 
त्यानंतर कुणालने मित्र मनोज सोनवणे, किरण पाटील, नंदू चव्हाण, विजय कोठावदे यांना या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी कुणालला साथ देण्याचे ठरवले. कुणालच्या मित्रांनी गावातील रंजनाबाई केशवराव शिंदे यांची कन्या देवयानी हिच्यासाठी कुणालचे नाव सुचवले. तसेच देवयानीचे मामा रवींद्र बेनुस्कर,भालचंद्र बेनुस्कर, अंबादास बेनुस्कर, भाऊ संदीप शिंदे चंदन सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली. दोन्ही कुटुंबांनी विवाहाला संमती दिल्यानंतर येथील महावीर भवनात दोन दिवसांपूर्वी कुणाल देवयानीचा विवाह झाला.
 
 या सोहळ्याचा सर्व खर्च कुणाल याच्या कुटुंबीयांनी केला. या वेळी पिंपळनेरसह धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, मुंबई, अकोला, गुजरात, मध्य प्रदेश आदी ठिकाणाहून समाजबांधव उपस्थित होते. नवदांपत्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी सुरेंद्र मराठे, आत्माराम बिरारीस, बबन दादा शिरसाठ, महात्मा फुले शेतकरी गटाचे व्ही. एन. जिरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष सुभाष जगताप, सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष प्रकाश अहिरराव, रवींद्र बेनुस्कर, निरंकारी मंडळाचे मुखी जगदीश ओझरकर, छगनदादा अहिरराव, रवींद्र दुसाने, संतोष विभांडिक, प्रमोद विभांडिक, नितीन बाविस्कर, वसंत दुसाने, जे. टी. नगरकर, दिलीप सूर्यवंशी, रवींद्र सूर्यवंशी, देविदास पंखेवाले, नितीन नगरकर, संकेत बधान आदी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...