आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्वच्छ ‘गोलाणी’ आजपासून चार दिवस बंद, जिल्हा प्रशासनाचा धडाकेबाज निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- एक हजाराहून अधिक गाळे असलेल्या आणि शहराच्या मध्यवर्ती भागातील अत्यंत वर्दळीचे गोलाणी मार्केट सलग चार दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले अाहेत. जागोजागी पडलेला कचरा, तळमजल्यावर साचलेले पाणी, जिने, स्वच्छतागृहांची दूरवस्था, जिने-लिफ्टच्या जागांमध्ये पान-तंबाखू थुंकल्यामुळे रंगलेल्या भिंती आणि सांडपाण्याचा निचरा झाल्याने परिसरात झालेली दुर्गंधी. या भयंकर अवस्थेबद्दल एका रहिवाशाने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे मे महिन्यात तक्रार केली होती. त्यानंतर हे मार्केट रविवार,दि.१६ ते १९ जुलै असे चार दिवस बंद ठेवण्याचे आदेश सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिले.
 
मे महिन्यात पालिका अधिकाऱ्यांना नोटीस
गोलाणीमार्केट आणि परिसरातील अस्वच्छता आणि सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका असून त्याबाबत गोलाणीतील रहिवासी काळे यांनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने उपविभागीय दंडाधिकारी जलज शर्मा यांनी २४ मे रोजी वस्तुस्थितीची पाहणी करून जिल्हाधिकार्यांना अहवाल सादर केला होता.त्यानंतर २९ मे रोजी उपविभागीय दंडाधिकार्यांनी मनपा अायुक्त,प्रदुषण नियंत्रण मंडळ,जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा शल्य चिकीत्सक आणि तालुका दुकाने निरीक्षकांना नोटिस बजावून जून पर्यंत अहवाल सादर करण्याचे अादेश दिले होते. त्यानंतर मनपाने स्वच्छेतेबाबत काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत याचा अहवाल उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी स्वच्छतेच्या पुराव्यांसह उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला होता. त्यानंतर महापालिकेने शहरातील सर्वच मार्केटमधील गाळेधारकांना नोटीसा बजावून मार्केटची स्वच्छता व्यापारी आणि गाळेधारकांनाच करावी लागेल, अशा आशयाची नोटीस जून रोजी बजावली होती. त्यामुळे रविवारपासून गोलाणी मार्केट बंद ठेऊन मार्केटची स्वच्छता गाळेधारकांनाच करावी लागणार आहे.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त किशोर राजेनिंबाळकर यांनी सकाळी गोलाणीसह शहरातील विविध भागांची पाहणी केली. या वेळी गोलाणीतील सुमारे २३ दुकानदार-व्यापाऱ्यांना अस्वच्छतेबद्दल दंड ठोठावण्यात आला. स्वच्छतेसाठी एखादे मार्केट चार दिवस बंद ठेवण्याच्या निर्णयाची ही पहिलीच वेळ अाहे. शनिवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाचे आदेश येताच गोलाणी मार्केटमधील व्यावसायिक, दुकानदार, विविध क्लासेसच्या मालकांमध्ये खळबळ उडाली. याठिकाणी एकूण हजार ८५ गाळे आहेत. यामध्ये मोबाइल शोरुम, मोबाइल वस्तू विक्री- दुरुस्तीची दुकाने, भाजीपाला मार्केट, कोचिंग क्लासेस, वृत्तपत्रांची कार्यालये, इलेक्ट्रॉनिक्स, मिठाई भांडार, ऑटोमोबाइल,घड्याळ्यांसह सर्वच प्रकारचे भव्य शोरूम, दुकाने आहेत. त्यामुळे शहराव्यतिरिक्त जिल्हाभरातून येणाऱ्या लोकांची दररोज प्रचंड गर्दी असते. या मार्केटमध्ये दररोज एक कोटी रुपयांची उलाढाल होते, असा अंदाज आहे. त्यामुळेच व्यापारी-दुकानदारांमध्ये {उर्वरित. पान

गाळेधारकांची आज तातडीची बैठक
व्यापारी संकुल चार दिवस बंद ठेवण्याच्या निर्णयाची माहिती मिळताच, संकुलातील व्यावसायिकांची गर्दी मार्केटमध्ये जमली. मात्र, या संबंधीची कोणतीही पूर्वसूचना देता, अचानक जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अद्याप आम्ही याबाबत अनभिज्ञ आहोत. रविवारी यासंबंधी गाळेधारकांची बैठक सकाळी ११.१५ मायटी ब्रदर्स समोरील जागेत होणार असून यात बंद ठेवण्याविषयीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे गोलाणी व्यापारी संकुल असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कासट यांनी सांगितले. या निर्णयानंतर संघटनेचे पदाधिकारी पुरुषोत्तम टावरी, रामजी सूर्यवंशी, सुनील पंजवानी यांनी एकत्र येत व्यावसायिकांना या निर्णयाविषयी माहिती दिली.
 
३५० गाळेधारकांना नाेटीस
उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचाअादेश प्राप्त हाेताच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रात्री अाठ वाजेपासून मार्केटमधील गाळेधारकांना चार दिवस दुकाने बंद ठेवण्याबाबतची नाेटीस बजावण्यास सुरुवात केली. रात्री दहा वाजेपर्यंत ३५० गाळेधारकांना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नाेटीस बजावली.
- नितीन लढ्ढा, महापाैर
 
१३३ चा भंग केल्यास महिने कारावास
उपविभागीयदंडाधिकाऱ्यांनी (प्रांत) काढलेल्या अादेशात कलम १३३ नुसार गाळे बंद ठेवण्यास सांगितले. या कलमाचा भंग केल्यास किंवा करीत असल्याचे अाढळल्यास दाेषी व्यक्ती सहा महिने कारावासाच्या शिक्षेस पात्र ठरणार अाहे.

नियमाचा भंग होत नाही
शरद काळेयांच्या तक्रारीची चाैकशी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रभारी अायुक्त पदाचा अतिरिक्त पदभार येण्यापूर्वीच सुरु असल्याने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी तथा प्रभारी अायुक्त यांच्या विरुध्द आदेश काढले असा अर्थ हाेत नाही. यात काेठेही प्राेटाेकाॅलचा भंग हाेत नाही
- अॅड.केतन ढाके, जिल्हा सरकारी वकील
 
बातम्या आणखी आहेत...