आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: गणेश मंडळांना 20 सप्टेंबरपूर्वीच द्यावा लागणार जमा-खर्चाचा ताळेबंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सार्वजनिक गणेश मंडळांना उत्सवासाठी परवानगी घेतांना पंधरा दिवसात हिशेब सादर करण्याचे अादेश धर्मादाय अायुक्त कार्यालयातर्फे देण्यात अाले हाेते. त्यानुसार १५ दिवसातच हिशेब सादर करण्याबाबत मंडळांना बाध्य करण्यात येणार अाहे. शनिवारी पुण्यात अायुक्तांची बैठक हाेणार अाहे, या बैठकीत यावर शिक्कामाेर्तब हाेण्याची शक्यता अाहे. त्यामुळे नोंदणीकृत मंडळांना २० सप्टेंबरपूर्वी जमाखर्चाचा ताळेबंद सादर करावा लागणार आहे.
 
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडीसह सार्वजनिकरीत्या साजऱ्या होणारे इतर सण, उत्सवासाठी वर्गणी गोळा केली जाते. या कार्यक्रमांसाठी देणगी, वर्गणी जमा करण्यासंदर्भात लागणाऱ्या परवानगीसाठी धर्मादाय उपायुक्तांकडून ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा सार्वजनिक उत्सव मंडळांना करून देण्यात अाली हाेती. यंदाच्या वर्षी मंडळांची संख्या वाढलेली असताना धर्मादाय आयुक्तालयाची परवानगी घेण्याबाबत मंडळांची उदासीनता जाणवली. 
 
जिल्ह्यात शेकडाे मंडळ असतांना १७५ गणेश मंडळांनी नोंदणीसाठी धर्मदाय अायुक्त कार्यालयात अर्ज केले होते. त्यातील केवळ १४७ मंडळे नाेंदणी परवानगीसाठी पात्र ठरले. यात शहरातील १२० मंडळांचा समावेश आहे. उर्वरित जिल्ह्यातील केवळ २७ मंडळांची नोंदणी झाली. 
बातम्या आणखी आहेत...