आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव-मनमाड 160 किमीच्या तिहेरी रेल्वेमार्गासाठी 1100 काेटी खर्च; गाड्यांची संख्या वाढणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - मध्यरेल्वेच्या भुसावळ विभागातून देशाच्या आर्थिक राजधानीकडे जाणारा १६० किलोमीटर अंतराचा जळगाव ते मनमाड हा दुहेरी रेल्वे मार्ग प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मात्र, या मार्गावरील रेल्वे वाहतुकीचे प्रमाण तब्बल १४० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने नवीन गाड्या चालवण्यासाठी फारसी संधी नाही. आता मात्र तब्बल ११०० कोटी रुपये खर्च करून जळगाव ते मनमाडदरम्यान तिहेरी रेल्वेमार्ग होणार असल्याने सन २०२२पर्यंत ही अडचण दूर होईल. पहिल्या टप्प्यात जळगाव ते चाळीसगाव, तदनंतर चाळीसगाव ते मनमाडपर्यंत काम होईल. 
 
भुसावळ ते जळगावदरम्यान केवळ दुहेरी रेल्वेमार्ग असल्याने मुंबई, सूरतकडून भुसावळ, तर भुसावळकडून मुंबई सूरतकडे जाणाऱ्या प्रवासी मालगाड्या वेळेवर चालवणे शक्य होत नाही. प्रसंगी सुपरफास्ट गाड्यांना अनावश्यक ठिकाणी थांबा किंवा गती कमी करावी लागते. ही अडचण सोडवण्यासाठी चार वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या भुसावळ ते जळगावदरम्यान २४ किलोमीटर अंतरात तिसऱ्या चौथ्या रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. यापाठोपाठ सन २०२२ पर्यंत जळगाव ते मनमाड या १६० किलोमीटर अंतरात तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम होणार आहे. सर्वेक्षणानंतर तब्बल ११०० कोटी रुपये खर्चाच्या या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून येत्या सहा महिन्यात जळगाव ते चाळीसगाव या ९१ किलोमीटर अंतरात पहिल्या टप्याचे काम सुरू होईल. २०२१पर्यंत हे काम पूर्ण व्हावे, अशा रेल्वे बाेर्डच्या सूचना अाहे. यानंतर चाळीसगाव ते मनमाड हे ६९ कि.मी.चे काम २०२२ मध्ये पूर्ण होईल. हे काम पूर्ण झाल्यावर सुपरफास्ट, मेल, इतर प्रवासी गाड्या आणि मालगाड्या वेळेवर चालवणे शक्य होईल. 

दरराेज धावतात १६६ गाड्या 
जळगाव-मनमाडया मार्गावर दरराेज ११८ मेल एक्स्प्रेस, तर ४८ मालगाड्या धावतात. यामुळे रेल्वेमार्गाच्या उपयोगीचे प्रमाण तब्बल १४० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. भविष्यात नवीन गाड्यांची गरज वेगवान मालवाहतुकीसाठी तिसऱ्या रेल्वे मार्गाची नितांत गरज होती. 
 
३०४ लहान पूल 
सध्यादुहेरी असलेल्या जळगाव ते मनमाड मार्गावर २० स्थानके आहे. या लाइनचे तिहेरीकरण करताना १६० किलोमीटर अंतरात २२ मोठे, तर ३०४ लहान पुलांची नव्याने निर्मिती होईल. काही ठिकाणी त्यांचा विस्तारदेखील करण्यात येईल. 
 
बातम्या आणखी आहेत...