आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव पालिका निवडणूक शिवसेना चिन्हावर लढणार, महानगरप्रमुखपदी शरद तायडेंची नियुक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शिवसेनेचे पक्षीय संघटन वाढवण्यासाठी काही नवीन पदांची निर्मिती करण्यात अाली अाहे. जळगाव शहर प्रमुख हे पद कायम ठेवत महानगरप्रमुख म्हणून माजी नगरसेवक शरद तायडे यांची नियुक्ती करण्यात अाली अाहे. अागामी निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवून पक्षीय संघटन वाढवणार असून जळगाव महानगरपालिका शिवसेनेच्या चिन्हावर लढणार असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
अागामी मनपा निवडणूक डाेळ्यासमाेर ठेवून शिवसेनेने पक्षीय संघटन वाढवण्याचा अजेंडा डाेळ्यासमाेर ठेवला अाहे. मनपा निवडणुकीत माजी अामदार सुरेश जैन यांना साेबत घेवून शिवसेना चिन्हावर निवडणूक लढवली जाईल. भाजपने ज्या पद्धतीने नारायण राणे पॅटर्नप्रमाणे अाघाड्यांना साेबत घेतले अाहे. ताेच पॅटर्न वापरून शिवसेना स्थानिक पातळीवर अाघाड्यांना देखील साेबत घेईल. परंतु, त्यात पक्ष चिन्हावर निवडणुक लढवणार हे नक्की असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. शिवसेनेचे जळगाव महानगर प्रमुख म्हणून माजी नगरसेवक शरद तायडे, शहर प्रमुख गणेश साेनवणे, कुलभूषण पाटील, शहर संघटक म्हणून दिनेश जगताप, चाळीसगाव विधानसभेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून रोहिदास पाटील, चाळीसगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, चाळीसगाव तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, तालुका संघटक काशीनाथ गायकवाड, अमळनेर तालुका प्रमुख म्हणून विजय पाटील अाणि विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणून किरण पवार यांची नियुक्ती करण्यात अाल्याची माहिती जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिली. या वेळी शरद तायडे, गणेश साेनवणे, कुलभूषण पाटील, गजानन मालपुरे, पवन साेनवणे, शाेभा चाैधरी उपस्थित हाेते.
बातम्या आणखी आहेत...