आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महासभा: अाराेग्यप्रश्नी भाजपचा ठिय्या, साथ राेगांवर उपाययाेजनांसाठी समितीचा पर्याय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महानगरपालिकेची महासभा साेमवारी झाली. या वेळी भाजपने शहरातील नागरिकांचे अाराेग्य बिघडले असून त्यावर गांभीर्याने चर्चेची मागणी केली; परंतु खाविअाने अाधी पटलावरील विषयांना महत्त्व देत भाजपची मागणी फेटाळली. त्यामुळे सत्ताधारी विराेधकांतील संघर्ष पुन्हा एकदा सभागृहात पाहायला मिळाला. अाराेग्याचे गांभीर्य असताना इतर विषयांना महत्त्व देत असल्याचा अाराेप करत भाजपने थेट ‘वेल’मध्येच ठिय्या अांदाेलन सुरू केले. त्यामुळे वातावरण प्रचंड तापले हाेते. अखेर साथीच्या राेगांवर उपाययाेजनांसाठी अाराेग्याची समिती गठीत करून मार्ग काढण्यात अाला. 
 
गेल्या दाेन महिन्यांपासून डेंग्यू, चिकुनगुन्या स्वाइनफ्लूने थैमान घातले अाहे. घराघरात अाजार पसरला अाहे. याविषयी ‘दिव्य मराठी’ने देखील वृत्त प्रकाशित करून सत्य परिस्थती उजेडात अाणली हाेती. तसेच खुल्या भूखंडावर टाकण्यात येणाऱ्या घाणीमुळे देखील अाजार फैलावत असल्याचे स्पष्ट केले हाेते. त्यामुळे साेमवारच्या महासभेत हा विषय चर्चेला येणार हे नक्की हाेते. त्यानुसार सभेच्या सुरुवातीलाच भाजपने हा मुद्दा उपस्थित करत उपाययाेजना प्रशासनाच्या अपयशावर बाेलण्यास सुरुवात केली.
 
दरम्यान, महापाैर ललित काेल्हेंनी अाधी विषय पत्रिकेवरील विषयांनंतर अाराेग्याचा मुद्दा घेण्याचे जाहीर केले. भाजपचे नगरसेवक सुनील माळी, रवींद्र पाटील, पृथ्वीराज साेनवणे, अॅड. शुचिता हाडा यांनी अाग्रही भूमिका मांडताच भाजप खाविअाच्या नगरसेवकांमध्ये तू-तू-मैं-मैं सुरू झाली. त्यामुळे वातावरण आणखीणच तापले अाणि भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी महापाैरांच्या समाेर ठिय्या अांदाेलन सुरू केले. सभागृह नेत्यांनी थेट भाजपच्या नगरसेवकांना शिस्त पाळण्याचे अावाहन केले; परंतु त्यानंतरही काहीही उपयाेग हाेत नसल्याने महापाैर काेल्हेंना अावाहन करत भाजप नगरसेवकांना निष्कासित करण्याची मागणी केली. त्यामुळे अाणखी वातावरण तापले. अखेर नितीन लढ्ढा यांनी मध्यस्थी करत भाजपच्या नगरसेवकांना जागेवर बसण्याचे अावाहन केले. 
 
अॅड.हाडांनी मांडली भूमिका 
अाराेग्यावरचर्चा सुरू झाल्यानंतर भाजपतर्फे अॅड. शुचिता हाडा यांनी भूमिका मांडली. अाराेग्याच्या समस्येने सर्वच त्रस्त अाहेत. अामदारांच्या पत्नी, नगरसेविका तसेच प्रत्येकाच्या घरात डेंग्यूचे रुग्ण अाहेत. महापाैर प्रभारी अायुक्त काम करताहेत; परंतु कर्मचारी याेग्य पद्धतीने जबाबदारी पार पाडत नसल्याचे मत व्यक्त केले. शहरात साफसफाईचे काम १०० टक्के हाेत नसल्याची खंत व्यक्त करत ठेकेदारामार्फत १० ते १२ कर्मचाऱ्यांवर सफाईचे काम करून घेतले जात असल्याची शाेकांतिका व्यक्त केली. कचरा अाढळल्यास ठेकेदाराला दंड केला जाताे; परंतु त्यामुळे प्रश्न सुटत नसून नागरिकांना चांगली सेवा पुरवणे ही जबाबदारी असल्याची जाणीव करून दिली. त्यामुळे केवळ सक्षम अधिकारी असून उपयाेग नसून सक्षम यंत्रणा असणे गरजेचे असल्याचे सांगितले. नागरिकांनीही सजग हाेणे गरजेचे असून प्रशासनाने ही काळजी मे-जून पासूनच घेणे गरजेचे हाेते. अापण कुठेतरी कमी पडलाेय, कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवणे गरजेचे अाहे, असेही हाडा म्हणाल्या. 
 
‘नगरसेवक घराेघरी’ माेहीम गरजेची 
अाजारांमुळेअनेकांच्या जीवावर बेतले. १५ ते २० वर्षांत कधी नव्हे इतका प्रभाव जाणवला. प्रत्येक घरात रुग्ण अाहेत. कचरा निर्माण कसा हाेताे, यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे अाहे. सर्वेक्षणासाठी केवळ १० कर्मचारी आहेत; त्यामुळे ‘महापाैर अापल्या दारी’ माेहिमेसाेबत ‘नगरसेवक घराेघरी’ माेहीम राबवणे गरजेचे असल्याचे मत नवनियुक्त स्वीकृत सदस्य डाॅ. राजेश पाटील यांनी व्यक्त केले. 
 
कविवर्य महानाेरांनी साेडले घर 
कविवर्यपद्मश्री ना. धाें. महानाेर यांना अस्वच्छतेमुळे स्वत:चे घर साेडावे लागले. शहराच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडरची ही स्थिती ही अाहे, तर सर्वसामान्यांची काय असेल? त्यामुळे शरमेने मान खाली गेली अाहे. एका दिवसात स्वच्छता हाेते, तर मग त्यात सातत्य का राहत नाही? असा सवालही अॅड. हाडा यांनी केला. 
 
सर्वपक्षीय समिती गठीत 
नितीन लढ्ढा यांनी अाराेग्य विषयावर कृती अाराखडा तयार करणे गरजेचे असून अाराेग्य समिती गठीत करण्याचा प्रस्ताव दिला. या समितीच्या प्रमुखपदी अॅड. शुचिता हाडा यांची नियुक्ती केली. या समितीच्या सदस्यांची तातडीची बैठक महापाैरांकडे घेण्यात येणार अाहे. ही समिती मंगळवारपासून कार्यरत हाेणार अाहे.
 
‘दिव्य मराठी’च्या वृत्ताचा उल्लेख 
‘दिव्यमराठी’ने गेल्या काही दिवसांत शहरातील अाराेग्याचा प्रश्न तसेच अस्वच्छतेसंदर्भात मांडलेल्या वस्तुस्थितीचा उल्लेख जिल्हाधिकारी तथा प्रभारी अायुक्त किशाेर राजेनिंबाळकर यांनी महासभेत केला. पालिकेच्या माध्यमातून उपाययाेजना सुरू अाहेत; परंतु नागरिकांनीही अापली जबाबदारी अाेळखणे गरजेचे अाहे. नगरसेवकांनी जागरूक हाेऊन मनपा कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याचे अावाहन केले. कचरा टाकण्यासाठी २५० कंटेनर खरेदी करणार असल्याचे सांगितले; परंतु नागरिक कचरा कुंडीत टाकण्याएेवजी बाहेर टाकतात, अशी खंत व्यक्त केली. दुकानासमाेर घाण टाकली जाते. त्यामुळे गटारी तुंबतात. तातडीने शहरातील बांधकामांच्या ठिकाणांची पाहणी करून पाण्याचे हाैद डबकी साफ करण्याची कारवाई होईल. यासाठी नगरसेवकांनी प्रशासनाला साथ देण्याचे अावाहन केले. 
बातम्या आणखी आहेत...