आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीचे वारे: मूलभूत सुविधांसाठी भाेळेंसह भाजपचा अधिकाऱ्यांना घेराव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अाठवड्यापूर्वीच महापालिकेत कानउघाडणी करून गेलेल्या अामदार सुरेश भाेळे यांनी साेमवारी पुन्हा धडक माेर्चा अाणला. शहरातील मूलभूत साेयी-सुविधा संदर्भात तक्रारींचा गठ्ठा अधिकाऱ्यांसमाेर सादर करत समस्या किती दिवसांत साेडवणार? यासाठी अाग्रही भूमिकादेखील घेतली. अधिकाऱ्यांकडून ठाेस उत्तर मिळत नसल्याचे लक्षात येताच भाजपच्या शेकडाे कार्यकर्त्यांनी सभागृहातच अधिकाऱ्यांना घेराव घातल्याने वातावरण चांगलेच तापले हाेते. महिनाभराचा वेळ निश्चित करत अधिकाऱ्यांनी अामदारांच्या उपस्थितीत झालेल्या गाेंधळातून वाट माेकळी करून घेतली. 
 
शहरातील समस्यांचा अाता डाेंगर झाला अाहे. शहराच्या प्रत्येक भागात साफसफाई, पुरेसा पाणीपुरवठा, पथदिवे तसेच रस्त्यांवरील खड्डे या समस्या कायम अाहेत. अस्वच्छतेमुळे नागरिकांचे अाराेग्य धाेक्यात अाल्याने अामदार भाेेळेंच्या नेतृत्वात जवळपास २०० पेक्षा अधिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापालिका गाठली. लाेकशाही दिन अाटाेपून बाहेर पडणाऱ्या अधिकाऱ्यांना पुन्हा सभागृहात बाेलत भाजपच्या कार्यकर्त्यांनी महासभेतच समांतर महासभा चालवली. या वेळी गटनेते सुनील माळी, पृथ्वीराज साेनवणे, नितीन पाटील, दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी यांच्यासह शेकडाे कार्यकर्ते सभागृहात उपस्थित हाेते. दहा महिन्यांवर पालिकेची निवडणूक असताना अचानक भाजपने अाक्रमक भूमिका घेतल्याने निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाल्याची चर्चा या वेळी सुरू हाेती. 
 
अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
भाजपच्या मंडळातील अध्यक्ष पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील प्रमुख तक्रारींचे निवेदन तयार करून अप्पर अायुक्त राजेश कानडे, उपायुक्त चंद्रकांत खाेसे, सहायक अायुक्त लक्ष्मीकांत कहार विभागप्रमुखांना सादर केले. शहरात एवढ्या अडचणी असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांना त्या दिसत कशा नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला. कुणी बाेलल्याशिवाय त्या समस्या साेडवायच्याच नाहीत, अशी प्रतिज्ञा केली अाहे का? असा खाेचक सवाल करण्यात अाला. अनेक कामांना मंजुरी मिळाली मग, घाेडे कुठे अडले अाहे, याची विचारणा या वेळी करण्यात अाली. 
 
महिनाभरानंतर पुन्हा पालिकेत 
एकमहिन्यात प्रशासनाने समस्यांचे निराकरण केल्यास पुन्हा पालिकेत धडक माेर्चा काढण्यात येईल. तसेच रस्त्यावर उतरून अांदाेलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात अाला. अधिकाऱ्यांनी तक्रारी साेडवल्यास पालिकेत येऊन त्यांचे अभिनंदन करू, असे अामदार भाेळेंनी सांगितले. राेजी पालकमंत्री जळगावात येत असल्याने त्यांच्याकडेही भूमिका मांडणार असल्याचे ते म्हणाले. 
 
जिल्हाधिकाऱ्यांनी येणे टाळले 
पालिकेत येण्यापूर्वी अामदार भाेेळेंनी पालिकेत संपर्क करून अायुक्तांना निवेदन द्यायला येत असल्याचा निराेप दिला. परंतु, अायुक्त तथा जिल्हाधिकारी किशाेर राजे निंबाळकर नसल्याचे या वेळी सांगण्यात अाले. अायुक्तांना बाेलवा अन्यथा खुर्चीला निवेदन देण्याची भूमिका भाजप कार्यालयातून कळवण्यात अाली. त्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडून पालकमंत्र्यांच्या दाैऱ्याचे नियाेजन करत असल्याने पालिकेत येणे शक्य नसल्याचा निराेप देण्यात अाला. त्यामुळे तासभर थांबून असलेले कार्यकर्ते दुपारी १२ वाजेनंतर पालिकेत पाेहोचले. 
बातम्या आणखी आहेत...