आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेत साहेबांपेक्षा शिपाईंची संख्या अधिक; मंजूर पदे 2624; कार्यरत पदे 2012, रिक्त पदे 612

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेच्या अडचणीत येण्यामागे कर्जासाेबत पालिकेतील प्रशासकीय खर्चही तेवढाच जबाबदार धरला जात अाहे. पालिकेत गेल्या अनेक वर्षात पदाेन्नतीची प्रक्रिया पार पडल्याने बहुसंख्य कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार साेपवण्यात अाला अाहे. त्यात लिपीकांपेक्षाही शिपायांची संख्या अधिक अाहे. सध्यस्थितीत ६१२ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून त्यात वर्ग ची ३३३ पदे रिक्त अाहेत. 
 
शहरातील विकास कामांवर जेवढा खर्च गेल्या काही वर्षात झाला नाही त्यापेक्षा जास्त खर्च अास्थापनेवर झाल्याचे बाेलले जाते. त्यात काही वर्षात मिळणारे लाभामुळे स्वेच्छानिवृत्तीची मानसिकता बळावली अाहे. 
 
शिपाई करताय महत्त्वाचे काम 
पालिकेच्याबहुसंख्य विभागात बऱ्याच वर्षापासून पदाेन्नती मिळाल्याने कर्मचाऱ्यांना अाहे त्याच पदावर काम करावे लागत अाहे. बऱ्याच कर्मचाऱ्यांनी शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली अाहे. तर अनेकांना तांत्रिक ज्ञान अाहे. सध्या पालिकेच्या अनेक विभागातील संगणक अाॅपरेटर, पदाधिकाऱ्यांचे सहायक, रेकाॅर्ड रूम यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडत अाहेत. 
 
अशी अाहेत पदांची स्थिती 
पालिकेतवर्ग ची मंजूर पदे ८८५ असून सध्या कार्यरत ५५२ कर्मचारी अाहेत. तर ३३३ पदे अजूनही रिक्त अाहेत. तसेच वर्ग ची १०८३ पदे मंजूर असून कार्यरत पदे ८५१ अाहे तर २३२ पदे रिक्त अाहेत. सफाई कामगारांची ६५६ पदे मंजूर असून ६०९ पदे कार्यरत अाहेत तर ४७ पदे रिक्त अाहेत. एकंदर पालिकेत २६२४ पदे मंजूर असून २०१२ पदांवर कर्मचारी कार्यरत अाहेत. तर गेल्या काही वर्षात ६१२ पदे रिक्त अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...