आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडक मोहिम: पहिल्याच दिवशी तब्बल 75 लाखांची थकबाकी वसुली; मालमत्ता जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी रस्त्यावर उतरलेल्या पालिकेच्या पथकांनी शुक्रवारी जाेरदार कामगिरी बजावली. पहिल्याच दिवशी तब्बल ७५ लाख रुपयांची थकबाकी वसूल करत तब्बल मालमत्तांची जप्ती केली अाहे. अार्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेच्या तिजाेरीत एकाच दिवसात माेठा खजिना जमा झाल्याने चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे काैतुक हाेत अाहे.
 
गेल्या दाेन दिवसांपूर्वी महापालिकेचे प्रभारी अायुक्त तथा जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर यांनी शहरातील थकबाकीदार मालमत्ताधारकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला हाेता. अाता नाेटीस देऊन वारंवार सूचना करण्याएेवजी थेट कारवाईचा निर्णय घेण्यात अाला अाहे. यासाठी १६ पथक तयार करण्यात अाले असून १९० अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा वसुलीच्या कामासाठी नियुक्त करण्यात अाला अाहे. शुक्रवारी माेहिमेच्या पहिल्याच दिवशी चारही प्रभाग समितींमधून ७५ लाख २८ हजार ५५५ रुपयांची वसुली करण्यात अाली अाहे.
 
जप्तमालमत्तांचा लिलाव हाेणार
थकबाकीची वसुली करा अन्यथा मालमत्ता जप्तीची कारवाई करा, असा फतवा निघाल्यानंतर दरराेज १० थकबाकीदारांकडे पालिकेचे पथक जाणार अाहेत.पहिल्याच दिवशी मालमत्ता कराची थकबाकी भरल्याने मालमत्ता जप्त करण्यात अाल्या अाहेत. या मालमत्तांचा लिलाव करण्याच्या दृष्टीने हरकती सूचना मागवण्यात येणार अाहेत. त्यानंतर मालमत्तांचा लिलावाची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे अपर अायुक्त राजेश कानडे यांनी सांगितले.
 
अभियंतांनी अाणला ५५ लाखांचा धनादेश : वसुली पथकांचे प्रमुख म्हणून विभाग प्रमुखांवर जबाबदारी निश्चित केली अाहे. दरम्यान प्रभाग समिती मध्ये सहायक अभियंता एस.एस.भाेळे यांनी एका थकबाकीदाराकडून ५५ लाख ६६ हजार रुपयांचा धनादेश मिळवला. तसेच अन्य पथकांनी लाख ७० हजार ४९० रुपयांची तर प्रभाग समिती मध्ये लाख ३९ हजार रुपयांची तर प्रभाग समिती मध्ये १३ लाख ६९ हजार ८७९ रुपयांची अाणि प्रभाग समिती मध्ये सायंकाळपर्यंत अालेल्या माहितीनुसार २० हजार ५५५ रुपयांची वसुली करण्यात अाली हाेती. यात नटवर थिएटर प्रशासनाने १० लाख रुपये, अशाेक टाॅकीज प्रशासनाने ३९ लाख रुपये तर नेक्स्ट शाे रूमकडील लाखांचा धनादेश पालिकेच्या ताब्यात मिळाल्याचे अपर अायुक्त कानडे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...