आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हागणदारीमुक्ती गरजेची, अन्यथा निधीवर गंडांतर; नगरविकास उपसचिव यांच्या सूचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोदवड- हागणदारीमुक्तीचे उद्दिष्ठ गाठण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा. उद्दिष्टपूर्ती झाल्यास इतर योजनांचा निधी मिळणार नाही, अशा स्पष्ट सूचना नगरविकास उपसचिव सुधाकर बोबडे यांनी दिल्या. गुरूवारी त्यांनी बोदवड नगरपंचायतीमध्ये बैठक घेतली. 
 
शौचालयांच्या उद्दिष्टांचा आढावा घेण्यासाठी बोबडे यांनी गुरूवारी बोदवडचा दौरा केला. नगरपंचायतीला २१५१ वैयक्तीक शौचालयांचे उद्दिष्ठ देण्यात आले आहे. त्यापैकी ९३५ शौचालयांसाठी शासनाकडून प्रत्येकी १२ हजार रुपयांप्रमाणे कोटी १२ लाख २३ हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. उपसचिव बोबडे यांनी शौचालय उद्दिष्टांचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय अन्य योजनांचा निधी मिळणार नाही, असे स्पष्ट केले. जिल्हा प्रशासन अधिकारी अनिकेत मानोरकर, तहसीलदार तथा नगरपंचायतीचे प्रशासक भाऊसाहेब थोरात, नगराध्यक्षा मुमताजबी बागवान, उपनगराध्यक्ष नितीन चव्हाण यांच्यासह सर्व १७ नगरसेवक उपस्थित होते. 
 
आकडेवारी अशी 
१४व्या वित्त आयोगातून शौचालय लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच हजारांचे वाढीव अनुदान देण्यात आले. ९३५ शौचालयांसाठी पहिला हप्ता म्हणून १०२६ प्रत्येकी सहा हजार, तर ८८३ लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्यातील सहा हजार रुपये, तर तिसऱ्या हप्त्यात ३९५ लाभार्थींनी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. 
 
१९ शौचालयांची दुरुस्ती 
शहरातील १९ सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती सुरू आहे. तसेच नवीन ४८ शौचालयांचे बांधकाम मंजूर झाले आहे, अशी माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी बैठकीत दिली. 
 
कायम सीओ द्या 
नवनिर्मित बोदवड नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावे, अशी मागणी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी उपसचिवांकडे मांडली. तसेच कर्मचाऱ्यांची संख्या अाणि कामकाजातील अन्य अडचणी नगरसेवकांनी मांडल्या. या समस्या सोडवण्याचे आश्वासन उपसचिवांनी दिले. 
 
बातम्या आणखी आहेत...