आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: उपमहापाैरपदी गणेश साेनवणेंची बिनविराेध निवड; उद्या घाेषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेच्या महापाैर निवडीनंतर उपमहापाैरपदासाठी देखील एकच अर्ज दाखल झाला अाहे. त्यामुळे खाविअाचे ज्येष्ठ नगरसेवक गणेश बुधाे साेनवणे यांच्या उपमहापाैर बिनविराेध निवडीची अाैपचारीकता बाकी अाहे. भाजप वगळता सर्वपक्षीय नेते नगरसेवकांच्या उपस्थितीत साेमवारी सकाळी ११.३० वाजता साेनवणे यांचा अर्ज दाखल करण्यात अाला. अधिकृत घोषणा बुधवारी पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांचा अध्यक्षतेखाली हाेणाऱ्या विशेष सभेत करण्यात येणार अाहे.
 
खाविअाच्या पाठिंब्याने मनसेचे गटनेते ललित कोल्हे यांनी महापाैर निवडीपूर्वी अापल्या उपमहापौर पदाचा राजीनामा दिला हाेता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपमहापाैर पदासाठी राेजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला हाेता. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी खाविआचे गणेश सोनवणे यांनी नगरसचिव अनिल वानखेडे यांच्याकडे तीन उमेदवारी अर्ज दाखल केले. पहिल्या अर्जावर सूचक म्हणून माजी महापौर नितीन लढ्ढा, अनुमोदक संदेश भोईटे, दुसऱ्या अर्जावर सूचक म्हणून खाविआचे अध्यक्ष रमेश जैन, अनुमोदक किशोर पाटील, तर तिसऱ्या अर्जावर सूचक म्हणून महापौर ललित कोल्हे आणि अनुमोदक राष्ट्रवादीचे नगरसेवक सुरेश सोनवणे यांची स्वाक्षरी आहे. सोनवणे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतांना महापौर ललित कोल्हे, माजी महापौर नितीन लढ्ढा, खाविआचे अध्यक्ष रमेश जैन, स्थायी समिती सभापती डॉ.वर्षा नारायण खडके, नगरसेवक सुनील महाजन, कैलास सोनवणे, जितेंद्र मुंदडा, विष्णू भंगाळे, श्यामकांत सोनवणे, बंटी जोशी, सुरेश सोनवणे, रवींद्र मोरे, जयश्री इंगळे, सुनिल पाटील, नितीन नन्नवरे, संतोष पाटील, प्रमोद नाईक, राजू शिरसाठ, प्रशांत नाईक आदी उपस्थित होते. भाजपचे नगरसेवक देखील यावेळी थाेड्या वेळाने उपस्थित झाले हाते. उपमहापौर निवडीसाठी १३ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत विशेष सभा होणार आहे. 

साेनवणे हे गेल्या ३० वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून माजी अामदार सुरेश जैन यांच्याशी एकनिष्ठ अाहेत. सन २००८ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढली हाेती. यादरम्यान त्यांना सभागृहात विराेधीपक्षनेते पदही मिळाले हाेते. सध्या ते खाविअाचे गटनेते असून ज्येष्ठ नगरसेवकांपैकी एक अाहेत. साेनवणे यांच्या कुटुंबात त्यांच्या अाई भागीरथी साेनवणे यांनीही प्रतिनिधीत्व केले असून त्या उपनगराध्यक्षा हाेत्या. तसेच साेनवणे हे अखिल भारतीय काेळी समाजाच्या प्रदेशाचे कार्याध्यक्ष अखिल भारतीय काेळी समाजाचे राष्ट्रीय सदस्य अाहेत. वयाच्या २५ वर्षी नगरसेवक म्हणून निवडूून अाले हाेते. 
 
बातम्या आणखी आहेत...