आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप अध्यक्षपदासाठी चुरस, पक्षांतर्गत धुसफुस रोखण्याचे नेतृत्वासमोर आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेणत्याही पक्षाच्या तालुका शहराध्यक्ष पदाला महत्त्व असल्याने फार माेठी चुरस यासाठी हाेणार अाहे. यासाठी पक्षातील दाेन्ही गटातील पदाधिकारी सक्रिय झाले असून त्यासाठी थेट पक्ष नेतृत्वाला गळ घातली जात अाहे. पुढे पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा अनेक निवडणुका असल्याने पक्षास वेळ देणारा कार्यकर्ता शाेधावा लागणार अाहे.
चाळीसगाव- भाजपतीलपक्षांतर्गत नियुक्त्या हाेऊ घातल्या असून तालुकाध्यक्ष शहराध्यक्षपदासाठी सर्वाधिक चुरस निर्माण हाेईल. मागील निवडणुकीत तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष निवडीनंतर नाराजी नाट्य समाेर अाले हाेते. विधानसभा निवडणुकीदरम्यान हेच चित्र पहायला मिळाले. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला अाता सावध भूमिका घ्यावी लागेल.
दिल्लीत मुंबईत भाजपचे सरकार, खासदार अामदार भाजपचेच, बाजार समितीत पक्षाचीच सत्ता, यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचे ‘अच्छे दिन’चे स्वप्न साकार झाले. मात्र, काही कार्यकर्त्यांना अाजही अच्छे दिन अाले नसल्याचे वाटते. कार्यकर्ते काही पदाधिकारी तसे खासगीत बाेलूनही दाखवितात. अंतर्गत कुरबुरीमुळे कार्यकर्त्यांची मानसिकता अशा पद्धतीने झाली असल्याचे बाेलले जात अाहे. त्यातच विविध शासकीय समित्यांच्या निवडप्रक्रिया रखडल्या अाहेत. युतीचे शासन येऊन वर्षाचा कालावधी लाेटला तरी समित्या गठीत हाेत नसताना पक्षांतर्गत पदासाठीच्या निवडणूक ताेंडावर अाल्याने कार्यकर्ते अचानक सक्रिय झाले अाहेत. एकूणच पक्षांतर्गत हाेणाऱ्या निवडणुकीसाठी चुरस निर्माण हाेणार अाहे. यात नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची अाशा कार्यकर्त्यांना असून यासाठी नेते मंडळींकडे प्रयत्न करण्यात येत अाहे. मात्र, पक्ष काही काळापासून पक्षाच्या दूर गेलेले कार्यकर्ते पदाधिकारी निवडणुका समाेर येताच पुन्हा सक्रिय झाले अाहेत. त्यांचेसमाेर नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांचे अाव्हान अाहे. त्यामुळे फार माेठ्या प्रमाणात चुरस निर्माण हाेणार अाहे. प्राप्त माहितीनुसार दि. ते १५ डिसेंबर दरम्यान तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष निवड हाेईल. १६ ते ३० दरम्यान जिल्हाध्यक्ष २३ अाॅक्टाेबर ते १० नाेव्हेंबर दरम्यान बुथनिहाय समित्या गठीत हाेतील. या काळात पक्षाचे महासंपर्क अभियान राबवण्यात येणार अाहे.

मागच्याअनुभवाचा अभ्यास
मागच्याकाळात तालुकाध्यक्षपदासाठी के.बी.साळुंखे शहराध्यक्षपदासाठी राजंेद्र चाैधरी यांच्या नावाला कडाडून विराेध झाला हाेता. त्याचवेळी अंतर्गत धुसफुस समाेर अाली हाेती. दाेघांच्याही नियुक्त्या रद्द कराव्यात, यासाठी थेट महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना साकडे घालण्यात अाले हाेते. मात्र, नावाची घाेेेषणा पक्षाकडूनच झाल्याने तेव्हा दाेघांचीही पदे सुरक्षित राहिले हाेते. त्यांच्या पक्षांतर्गत विराेधकांचे तेव्हा मनसुबे उधळले गेले हाेते. तेव्हापासून पक्षांतर्गत कुरबुरी सातत्याने समाेर अाल्या. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला यंदा सावध पवित्रा घ्यावा लागणार अाहे. तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष पदासाठी अाजी, माजी अध्यक्षांसह नवीन चेहरे संधीच्या शाेधात अाहेत. अामदार उन्मेष पाटील यांचा एक गट या निवडीदरम्यान सक्रीय हाेणार हे जवळपास निश्चित असल्याने त्यांचेच पक्षांतर्गत असलेले विराेधक कितपत यशस्वी हाेतात. हे लवकरच कळेल. त्यामुळे शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष अापल्याच मर्जीतील करून प‌क्षावर पकड बसवण्याचा प्रयत्न सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून हाेईल हे निश्चित अाहे.

शहरात आव्हान
आगामीनगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील पदाधिकाऱ्यांची मोट बांधण्याचे आव्हान असेल. त्या दृष्टीने शहराध्यक्ष निवड होईल. यासाठी स्पर्धा आहे.

इच्छुकांची लांबलचक यादी
तालुकाध्यक्षसाठीअाजी-माजी अध्यक्षांसह पं.स.चे माजी सदस्य दिनेश बाेरसे, भाऊसाहेब जगताप, रमेश साेनवणे तर शहराध्यक्षसाठी अाजी-माजी अध्यक्षांसह राजेंद्र पगार, घृष्णेश्वर पाटील, प्रभाकर चाैधरी, लालचंद बजाज इच्छुक आहेत.

पुन्हा एकदा वाद
टाकळीप्र.दे.येथे विकास साेसायटीतर्फे झालेल्या विकास कामांचे उद‌्घाटन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते झाले. मात्र, या कार्यक्रमादरम्यान पक्षांतर्गत वादविवाद पुन्हा एकदा पहावयास मिळाले. सायंकाळी या कार्यक्रमाचे फाेटाे साेशल मीडियावर व्हायरल झाले. या कार्यक्रमात अल्प उपस्थिती हाेती, असे चित्र रंगवण्यात अाले. त्यामुळे अायाेजक अस्वस्थ झाले. त्यानंतर थाेड्याच वेळात हा दावा खाेडून काढण्यासाठी गर्दी असलेले फाेटाे व्हायरल झाले. मात्र, भाजपतील मंडळींमध्ये धुसफुस असून काही कार्यकर्त्यांचा हा खोडसाळपणा असल्याचे सांगण्यात आले.