आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील 6 रस्त्यांवरील 45 दारू दुकाने, वाइन शाॅप, बिअरबार सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर सुरू असलेले वाइन शाॅप. - Divya Marathi
जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर सुरू असलेले वाइन शाॅप.
जळगाव- शहरातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग अाणि राज्य मार्गावरील बंद करण्यात अालेले ४५ वाइन शाॅप, बिअरबार अाणि दारूची दुकाने शनिवारी पुन्हा उघडली अाहेत. शहरातील सहा रस्ते महाापालिकेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व ४५ दुकानांना सुरू करण्याची परवानगी दिली अाहे. अाठवडाभरानंतर या दुकानांमध्ये पुन्हा लगबग सुरू झाली अाहे. महामार्गावरील ५०० मिटरच्या निकषात बसत असलेली जिल्ह्यातील ६०६ दारूची दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३१ मार्च राेजी बंद केले हाेते. 
 
दरम्यान, जळगाव शहरातून जाणाऱ्या सहा मार्गांमुळे बंद झालेली ४५ दुकाने रस्त्यांचा दर्जा कमी झाल्याने पुन्हा सुरू झाली अाहेत. शहरातून जाणाऱ्या रस्त्यांचा दर्जा कमी करण्यासाठी अामदार सुरेश भाेळे यांच्या शिफारसीवरून सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य शासनाला प्रस्ताव दिला हाेता. हा प्रस्ताव मंजूर झाल्याने हे सर्व रस्ते महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात अाले अाहेत. रस्त्यांचा महामार्ग हा दर्जा कमी झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अादेशाने शहरातील या रस्त्यावर असलेल्या ४५ दुकानांना परवानगी दिली अाहे. शनिवारी सर्व ४५ दुकाने ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेले हाेते. 
 
४५ दुकाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अादेशाने सुरू 
-राज्य शासनाच्या अादेशावरून शहरातील रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात अाले अाहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी अादेश दिल्याने शनिवारी या रस्त्यांवरील ४५ दुकानांना सुरू करण्याची परवानगी देण्यात अाली अाहे. एस.एल. अाढाव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. 
 
बातम्या आणखी आहेत...