आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाराेळ्यात उच्चभ्रू वस्तीत घरफोडी; 25 ताेळे साेने, 50 हजार राेख लांबवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरातील कपाटांमधील अस्ताव्यस्त फेकलेले साहित्य. - Divya Marathi
घरातील कपाटांमधील अस्ताव्यस्त फेकलेले साहित्य.
पारोळा - शहरातील बोरी कॉलनीत माजी प्राचार्य उल्हास पवार यांच्या बंद घराचे कुलूप ताेडून २५ ताेळे साेन्याचे दागिने ५० हजार रुपये राेख लांबवल्याची घटना शनिवारी रात्री घडली. घरातील सर्व कपाटे, डब्बे, काॅटमधील वस्तूंची नासधूस केलेली अाहे. याबाबत पाेलिसांत केवळ ५० हजार रुपये चाेरी झाल्याची नाेंद करण्यात अालेली अाहे. 

अामदार डॉ. सतीश पाटील यांचे बंधू नगराध्यक्ष करण पवार यांचे काका किसान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य उल्हास पवार हे पत्नी प्रा. प्रभा पवार यांच्यासह १७ रोजी मुलीकडे कल्याण येथे गेले होते. बोरी कॉलनीमधील घराला कुलूप होते. पवार दांपत्य रविवारी सकाळी वाजता कल्याणहून पारोळा येथे आल्यानंतर त्यांना घरातील लाइट सुरू असल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी शेजारी माहिती घेतली; परंतु त्यांना याबाबत माहीत नसल्याचे सांगण्यात अाले. घराची चाबी घेत त्यांनी कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही दरवाजांचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसले. घरातील चारही खाेल्यांमधील सर्व कपाटे, डब्बे, काॅट, डायनिंग टेबल, किचनमधील साहित्याची नासधूस केलेली हाेती. घरातील प्रत्येक काेपरा अन् कोपरा शाेधून तब्बल २० ते २५ ताेळे साेने ५० हजार रुपये राेख चाेरून नेल्याची शक्यता अाहे. मात्र, याप्रकरणी प्रा. पवार यांनी अवघे ५० हजार लंपास झाल्याचा उल्लेख पाेलिस तक्रारीत केला अाहे. 
 
या काॅलनीत खासदार ए. टी. पाटील, आमदार डॉ. सतीश पाटील, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश जाधव यांच्यासह वकील, डॉक्टर राहतात. प्राचार्य पवार यांच्या मागील बाजूस नगराध्यक्ष पवार यांचे निवासस्थान अाहे. 
 
खासदार आमदारांचा संताप 
यावेळी याच कॉलनीत राहणारे खासदार ए. टी. पाटील आमदार डॉ. सतीश पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या वेळी आमदार डॉ. पाटील पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांना चांगलेच खडे बोल सुनावले. शहर तालुक्यात सर्रास सट्टा, पत्ता, जुगार सुरू असल्याचा आरोप केला. व्हीआयपी व्यक्तींकडे चोऱ्या होत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, पारोळा पोलिस स्टेशन हे हफ्तेखोर असल्याचा आरोप करून पोलिस निरीक्षकाच्या बदलीबाबत विधानसभेत आवाज उठवण्याचे संकेत आमदार डॉ. पाटील यांनी दिले. जिल्ह्यात पालकमंत्री असताना दरोडे, चोऱ्या होत असून कायदा सुव्यवस्था खराब झाल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांची बदली करण्याबाबत आपण वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे खासदार ए. टी. पाटील यांनी सांगितले. 
 
पोलिसांनी जळगाव येथून श्वानपथक ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. ते सकाळी ९.३० ते १० वाजेदरम्यान पोहोचले. श्वानास घेऊन कर्मचारी संदीप परदेशी मनोज पाटील यांनी श्वानास कुलूप तोडलेल्या दरवाजाचा वास दिला. त्याने महामार्गापर्यंतचा रस्ता दाखवत परत कॉलनीतील मोकळ्या जागेत फिरू लागला. यामुळे चोरट्यांनी या भागात आपले वाहन लावले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात अाला. ठसेतज्ज्ञ साहेबराव चौधरी यांनी घरातील कपाटं, किचनमधील डब्बे, ज्वेलरी बॉक्स, बॅग आदींचे ठसे घेतले. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, सीसीटीव्ही बंद... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...