आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: कर्जमाफीसाठी रणरणत्या उन्हात ठिय्या, महिला कार्यकर्त्यांनी दाखवल्या बांगड्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला कार्यकर्त्यांनी दाखवल्या बांगड्या - Divya Marathi
महिला कार्यकर्त्यांनी दाखवल्या बांगड्या
जळगाव- विराेधीपक्षांनी शेतकरी कर्जमाफीसाठी मंगळवारी रास्ता राेकाे अांदाेलन करीत जिल्हाधिकारी कार्यालयातील डांबरी रस्त्यावर उन्हात साडे सहा तास ठिय्या दिला. मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी दालनाबाहेर अाल्यामुळे ४२ अंश तापमानात केलेले विराेधकांचे अांदाेलन पेटले. तापलेल्या भुईवर बसलेल्या अांदाेलकांना उन्हाच्या तीव्रतेने उष्णतेचा फटका बसला. त्यात दाेघांना तातडीने सिव्हिलमध्ये दाखल करावे लागले. काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट), शेकाप, युनायटेड जनता दल या पक्षांनी प्रथमच केलेल्या एकत्रित अांदाेलनामुळे प्रशासन पाेलिसांची दमछाक उडाली. दरम्यान, जिल्हाधिकारी खाली येणार नाही ताेवर अांदाेलन मागे घेण्याचा अामदार डाॅ.सतीश पाटील यांनी निर्धार केल्यानंतर आंदोलन तीव्र झाले. सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलनकर्त्यांनी ठिय्या दिला. रात्री ९.३० वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलनाचा समारोप झाला. 
 
शेतकरी कर्जमाफीसाठी विराेधी पक्षांनी मंगळवारी दुपारी ३.१० वाजता अाकाशवाणी चाैकात रास्ता राेकाे अांदाेलन केले. चाैकातील १५ मिनिटांचा रास्ता राेकाे झाल्यानंतर अांदाेलक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. निवेदनासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याच्या विषयावरून अांदाेलक अाणि पाेलिसांमध्ये अर्धा तास शाब्दिक चकमक अाणि धक्काबुक्की झाली. अतिरिक्त पाेलिस अाणि वरिष्ठ पाेलिस अधिकारी दाखल हाेण्यापूर्वीच अांदाेलक पाेलिसांचा बंदाेबस्त धुडकावून कार्यालयात घुसले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याच्या विषयावरून प्रशासन अाणि अांदाेलकांमध्ये वाद रंगला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अामदार डाॅ.सतीश पाटील, अामदार सुधीर तांबे, माजी अामदार गुलाबराव देवकर, माजी अामदार दिलीप वाघ, माजी अामदार शिरीष चाैधरी, माजी अामदार अरुण पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील,महानगर अध्यक्ष डाॅ. ए. जी. भंगाळे, कार्याध्यक्ष डाॅ.राधेश्याम चाैधरी, डी. जी. पाटील, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष याेगेश देसले, अॅड.सचिन पाटील, वाल्मीक पाटील, राजेश पाटील, सलीम इनामदार, याेगेंद्रसिंग पाटील, महिला पदाधिकारी कल्पना पाटील, मंगला पाटील, मीनल पाटील, जि.प. सदस्या नीलिमा पाटील, सविता बाेरसे, लता माेरे, अरुणा पाटील सहभागी हाेते. जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू केलेले ठिय्या अांदाेलन रात्री ८.३० वाजेपर्यंत सुरू हाेते. अामदार डाॅॅ.सुधीर तांबे, दिलीप वाघ, विकास पवार, डाॅ. ए. जी. भंगाळे पदाधिकाऱ्यांनी रात्री वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट निवेदन घेण्यासाठी खाली येण्यासंदर्भात चर्चा केली. 
 
घाेषणांनी वेधले लक्ष 
जिल्हाधिकारी आवारात आंदोलकांनी नागपूरच्या पोपटाला कर्जमाफी नको हाय, जामनेरच्या पिंट्याला कर्जमाफी नको हाय'...,नही चलेगी, नही चलेगी तानाशाही नही चलेगी' अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनीही जोरदार घोषणाबाजी केली. दिलरुबाब तडवी यांनीही जोरदार भाषण केले. 
 
जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या आवारात येऊन निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर आंदोलक आक्रमक झाले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार शिरीष चौधरी,दिलीप वाघ यांच्यासह आंदोलकांनी सायंकाळी वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला घेराव घालून ठिय्या मारला. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध करण्यात येऊन सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी जनतेचे सेवक आहेत. त्यांना लोकप्रतिनिधींचे निवेदन घेण्यासाठी वेळ नाही. लाल दिव्याची गाडी, जनतेचा पगार जिल्हाधिकारी घेतात. त्यांची राजेशाह चालणार नाही, अशा शब्दात आंदोलकांनी आरोप करायला सुरुवात केली. घोषणाबाजी करून घसा कोरडा पडल्यामुळे आंदोलकांनी चहा-बिस्किटे खाल्ली. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला घेराव 
जिल्हाधिकारी बाहेर निघून जात असल्याची अफवा कानावर अाल्यामुळे राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष याेगेश देसले यांनी पळत जाऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाची हवा काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मागे धावत जात पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अामदार डाॅ.पाटील यांनी पुन्हा त्याला अांदाेलनात सहभागी करून घेतले. वाजता अांदाेलकांनी जागा बदलून थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला घेराव घातला. 
 
पोलिसांची तारांबळ 
आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पोलिस निरीक्षक आंदोलकांना समजावण्यासाठी जात होते. मात्र, आंदोलक आपल्या मागणीवर अडून बसले होते. शेवटी जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारायला येणार असल्याचा निरोप आला. जिल्हाधिकारी आल्यानंतर केवळ डॉ. सतीश पाटील त्यांच्याशी बोलतील, असे जाहीर करण्यात आले. त्यानंतर घोषणाबाजी बंद करण्यात आली. 
 
 
ते राजे आहेत, तर मी पवार 
जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर येऊन निवेदन घेऊ शकत नाहीत. त्याबाबत शासन निर्णय असल्याचा निरोप आंदोलकांपर्यंत पोहोचवण्यात आला. जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी येत नसल्याने आंदोलक अधिकच घोषणाबाजी करू लागले. जिल्हाधिकारी राजे असतील, तर मी सुद्धा पवार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारेपर्यंत आता मागे हटणार नाही. आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात अधिकाऱ्याने लोकप्रतिनिधींचे निवेदन स्वीकारल्याचे पहिल्यांदाच बघत आहे. त्यांना निवेदन स्वीकारावेच लागेल, अशी भूमिका डॉ. पाटील यांनी घेतली. 
 
महिला कार्यकर्त्यांनी दाखवल्या बांगड्या 
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सचिव कल्पना पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मंगला पाटील, महानगर अध्यक्ष मीनल पाटील, जिल्हा परिषद सदस्या नीलिमा पाटील, सविता बाेरसे, नगरसेविका लता माेरे, काँग्रेसच्या अरुणा पाटील यांनी अांदाेलनाचे नेतृत्व केले. जिल्हाधिकारी निवेदन घेण्यासाठी येत नसतील, तर त्यांनी हातात बांगड्या भराव्यात, असे म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हात करीत बांगड्या दाखवल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्या जाऊ लागल्या. मात्र, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाजूला असलेले गेट बंद करून महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले. या वेळी महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 
 
अामदार पाटलांचा निर्धार; माजी अामदारांची मध्यस्थी फेल 
अामदार डाॅ.सतीश पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन घेण्यासाठी तसेच चर्चा करण्यासाठी खाली यावे, अशी मागणी केली. दरम्यान, राजशिष्टाचारानुसार दालनाबाहेर येणार नाही, दालनातच निवेदन द्यावे, चर्चेसाठी आपण तयार असल्याचे जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर यांनी सांगितले. दुपारी वाजेपासून रात्री वाजेपर्यंत माजी अामदार शिरीष चाैधरी, माजी अामदार गुलाबराव देवकर, माजी अामदार दिलीप वाघ, माजी अामदार अरुण पाटील, पदवीधर मतदारसंघाचे अामदार डाॅ.सुधीर तांबे, राष्ट्रवादीचे जिल्हा समन्वयक विकास पवार, संजय पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील आदी नेत्यांनी मध्यस्थी करण्यासाठी प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्याशी चर्चा केली. आंदोलन सुरू असताना अशा चर्चेच्या अनेक फेऱ्या या नेत्यांनी मारल्या. कार्यालयाखाली आवारात येऊन निवेदन स्वीकारण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारत नसतील, तर पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी केली. 
 
पुढील स्लाईडवर पाहा फोटोज आणि वाचा सविस्तर बातमी... 
बातम्या आणखी आहेत...