आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रद्दीच्या गाेडाऊनला अाग; पाच लाखांची रद्दी खाक, नागरिकांच्या मदतीने अाग विझवण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सुप्रीम काॅलनी परिसरातील माेतीनगरातील रद्दीच्या गाेडाऊनला साेमवारी सकाळी ८.३० वाजता अचानक अाग लागून ते लाख रुपयांची रद्दी खाक झाली. महापालिकेच्या तीन अग्निशमन बंबांनी एक तासात अाग अाटाेक्यात आणली. याप्रकरणी एमअायडीसी पाेलिस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. 
 
माेतीनगरात हाजी शेख जाकीर तेली (रा. इस्लामपुरा, मेहरूण) यांच्या मालकीचे रद्दीचे गाेडाऊन अाहे. त्यांनी चार महिन्यांपूर्वीच माेतीनगरात गाेडाऊन घेतले हाेते. त्यात महिन्यांपासून साठवलेली रद्दी ठेवली हाेती. साेमवारी सकाळी ८.३० वाजता गाेडाऊनला अाग लागली. या आगीची माहिती आजूबाजूच्या रहिवाशांनी तेली यांना फाेनवरून दिली. त्यांनी तत्काळ मनपा अग्निशमन विभागाला अागीसंदर्भात माहिती दिली.
 
 सुरुवातील तेली यांनी नागरिकांच्या मदतीने पाणी टाकून अाग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन विभागाचे बंब दखल झाले. अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी एक तास प्रयत्न केल्यानंतर अाग अाटाेक्यात आणली. अाग विझवण्यासाठी एकूण तीन पाण्याचे बंब लागले. 
 
द्वेष भावनेने आग लावल्याचा संशय 
रद्दीचे गाेडाऊन असल्याने त्या ठिकाणी तेली यांनी इलेक्ट्रीकची फिटिंगही केलेली नव्हती. त्यामुळे शाॅर्टसर्किट हाेऊन अाग लागण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, गाेडाऊनच्या बाजूला दरराेज कचरा जाळण्यात येताे. कदाचित त्या आगीची ठिणगी गाेडाऊनमध्ये पडली असावी. त्यामुळे गाेडाऊनमध्ये अाग लागण्याची शक्यता आहे किंवा काेणी तरी द्वेष भावनेने अाग लावल्याचा संशय तेली यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी एमअायडीसी पाेलिस ठाण्यात अागीची नाेंद करण्यात अाली अाहे. 
बातम्या आणखी आहेत...