आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव- रेणुकानगरातील युवकाची गळफास घेऊन अात्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-  मेहरूण परिसरातील रेणुकानगरातील युवकाने घरात अाेढणीने गळफास घेऊन अात्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली अाहे. 

मजुरीचे काम करणारा रूपेश रघुनाथ गाेंधळी (वय २४) हा अाई सुमनबाई गाेंधळी यांच्यासाेबत रेणुकानगरात पार्टिशनच्या घरात भाड्याने राहात हाेता. सुमनबाई या घराबाहेर कपडे धुवत हाेत्या. कपडे धुवून झाल्यावर त्या घरात गेल्यावर वरच्या खाेलीत रूपेशने अाेढणीने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. त्याच्या अात्महत्येचे कारण कळू शकले नाही. 
बातम्या आणखी आहेत...