आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात 5 हजारांवर बालकामगार, हॉटेल्स, वीटभट्टी, कारखाने, बेकरीच्या ठिकाणी बालकामगारांचा शोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प कार्यालयातर्फे केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात हजार २७७ बालकामगार आढळून आले. त्याचा अहवाल कामगार आयुक्तांना सादर केला आहे. 
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प कार्यालयातर्फे स्वयंसेवी संस्थांना सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते. या संस्थांच्या १०० सर्वेअर्संनी जिल्हाभरात हॉटेल्स, वीटभट्टी, कारखाने, बेकरी आदी विविध ठिकाणी बालकामगारांचा शोध घेतला. कायद्यानुसार बालकामगारांना राबवून घेणे गुन्हा असला तरी जिल्ह्यात सर्रासपणे बालकामगार विविध ठिकाणी राबत असल्याचे आढळून आले. ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये हजार २७७ बालकामगार आढळून आले होते. हा अहवाल कामगार आयुक्तांमार्फत केंद्र शासनास सादर होईल. 

जिल्ह्यात बालकामगारांच्या १९ शाळा 
जिल्ह्यात बालकामगारांच्या १९ शाळा आहेत. त्यापैकी जळगाव शहरात तांबापुरा, खोटेनगर, आशाबाबानगर आणि रामानंदनगर या चार ठिकाणी बालकामगारांच्या शाळा आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सद्य:स्थितीत ८१२ बालकामगार आहेत. या बालकामगारांना दरमहा दीडशे रुपये मदत शासनातर्फे दिली जाते. त्याचप्रमाणे पोषण आहार शैक्षणिक सुविधाही दिल्या जातात. 
 
बालकामगारांच्या शाळा वाढणार 
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बालकामगार आढळून आलेले आहेत. ते १४ वयोगटातील बालकामगारांचे पुनर्वसन शाळांमध्ये करण्यात येते. मात्र, या मुलांचे गळतीचे प्रमाण जास्त आहे. पाच हजारांवर विद्यार्थी आढळून आल्यामुळे जिल्ह्यात वाढीव शाळा सुरू करण्याबाबत प्रस्तावित करण्यात येणार आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...