आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंगाडा कुरडई, टाेमॅटाे स्टीक, शेवया, पापडांनी वाढली लज्जत, जिल्ह्यातील 60 बचत गट सहभागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेवा बोर्डिंग येथे आयोजित खान्देश पापड महोत्सवात पापडांची खरेदी करताना नागरिक. - Divya Marathi
लेवा बोर्डिंग येथे आयोजित खान्देश पापड महोत्सवात पापडांची खरेदी करताना नागरिक.
जळगाव - जुन्या पारंपरिक पदार्थांनाच आधुनिकतेची जाेड देत पाैष्टिकता ठेवत खान्देश पापड महोत्सवात शिंगाड्याच्या पीठाची कुरडई, टाेमॅटाे चकली, स्टीक, मकापासून तयार केलेली शेव आदी पदार्थ्यांनी महोत्सवाची लज्जत वाढवली आहे. जळगाव जनता बँक आणि नाबार्डतर्फे लेवा बोर्डिंग येथे शुक्रवारपासून या महोत्सवाचा प्रारंभ झाला. एप्रिलपर्यंत सकाळी ते रात्री १० वाजेदरम्यान महोत्सव सुरू राहणार आहे. 
 
महाेत्सवाचे उद्घाटन मीना डाेकानिया, ममता कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात अाले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील अध्यक्षस्थानी होते. संचालिका सावित्री साेळुंके, डाॅ. अारती हुजुरबाजार उपस्थित हाेत्या. पापड, शेवया, वडे, बिबड्या, कुरडई, उपवासाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात बाजारात यावे घरची चव सर्वांना चाखायला मिळावी, तसेच खान्देशातील या पापडांनी सर्व भारतीय बाजारपेठ काबीज करावी, या हेतूने या महाेत्सवाचे अायाेजन गेल्या वर्षांपासून केले जात अाहे. 

या पापड महोत्सवात चाळीसगाव, पाचाेरा, अमळनेर, भुसावळ याठिकाणाहून सुमारे ६० बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या अाहेत. पापड हे २०० रुपये किलाेपासून असून काही पापड शेकडानुसार देखील उपलब्ध आहेत. या वेळी ललवाणी डाेकानिया यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा अावारे यांनी केले. 
 
 
प्रतिज्ञा महिला बचत गटातर्फे टाेमॅटाे, कैरी, बीट, हिरवी, मिरची काेथिंबीर अाणि पालक यासारख्या चवीचे पापडांचे पाकीट तयार करण्यात अाले अाहे. एकत्रित काॅम्बाे पॅक हा याठिकाणी वेगळा ठरताे अाहे. मिरची, माेहरी, जिरे, तिखट हे नेहमीच पापडांमध्ये वापरले जातात. पण ते अधिक चवदार करण्याचा प्रयत्न महिलांतर्फे करण्यात आला आहे. त्याचबराेबर नागलीची कुरडई, बटाटा शेव, खजूरचे लाेणचे, साबुदाणा, बीट कुरडई, मका शेव, साबुदाणा बिबडी यासारखे वेगळे पदार्थ्यांचे आकर्षण ठरत आहे. त्याचबराेबर तत्काळ फक्त पाणी टाकून घरीच बिबडीचा घाटा, अाेले चिक तयार करता येईल, असे काेरडे पीठही विक्रीला अाहे. तर पुण्याचा मधमाशी पालनाचा स्टाॅलही अाकर्षण ठरत अाहे. 
 
उन्हाळी पदार्थांचा समावेश 
नवीन पदार्थांसह उन्हाळ्यात तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांचाही समावेश आहे. यात अाेली बिबडी, बिबडी, ज्वारीचे वडे, साधे डाळींचे वडे, नागली, बटाटा,ज्वारी, बाजरी, चिकणीचे पापड, शेवया, कुरडई, उडदाचे पापड, गव्हाच्या चिकाचे पापड खासकरून पाहायला मिळत अाहेत. त्याचप्रमाणे खाद्य पदार्थांचेही वेगळे स्टाॅल यामध्ये अाहे. यात मुगाचे भजे, वडे, मंचुरीयनसह पाणीपुरी खास अाकर्षण ठरत अाहे. पुदीना, खट्टा मीठा, हिंग, लिंबू, लसूण यासारख्या चवींचे पाणी असलेल्या पाणीपुरीने वेगळी लज्जत वाढवली आहे. 
बातम्या आणखी आहेत...