आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: मारहाणीत मृत्यू झालेल्या पत्नीवर परस्पर अंत्यसंस्काराचा केला प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हा सामान्य रूग्णालयात बसलेले कलाबाई साेनवणे यांचे नातेवाईक. - Divya Marathi
जिल्हा सामान्य रूग्णालयात बसलेले कलाबाई साेनवणे यांचे नातेवाईक.
जळगाव -शिरसोली येथे बुधवारी रात्री मद्याच्या नशेत धारदार शस्राने वार केल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच गुरुवारी सकाळी तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला एमआयडीसी पोलिसांनी शिरसोली येथून ताब्यात घेतले. गुरुवारी सकाळी पोलिस पाटलाकडून या घटनेची खबर मिळताच एमआयडीसी पोलिसांनी स्मशानभूमीकडे धाव घेत महिलेचा मृतदेह आणि तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला अटक केली. बुधवारी रात्री मद्याच्या नशेत पत्नीच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केल्याने ती जखमी होऊन रात्रभर जमिनीवरच निपचित पडून होती. मात्र, अतिरक्तस्रावामुळे गुरुवारी सकाळी तिचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी हत्येची घटना दडपण्यासाठी मृतदेह स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला होता. 
 
शिरसाेली येथील अशाेक भिका साेनवणे (वय ५९) अाणि त्याची पत्नी कलाबाई अशाेक साेनवणे (वय ५५) यांच्यात दारू पिल्यानंतर दररोज वाद होत असत. बुधवारी रात्रीही कडाक्याचे भांडण झाल्यानंतर दाेघांमध्ये हाणामारी झाली. त्यात पती अशाेक साेनवणे याने पत्नी कलाबाई हिच्या छातीवर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. त्यामुळे कलाबाई जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळली. पत्नी बेशुद्धावस्थेत असल्याचे समजून पती अशोक झोपून गेला. मात्र, तिला लागल्याने रक्तस्राव झाला. त्यामुळे तिचा मुलगा रितेश (वय ९) हा गावातील डाॅक्टरकडे गेला. तसेच विवाहित मुलगी अनिता (वय २५) हिने कलाबाईच्या जखमेवर हळद लावली. डाॅक्टरांनी कलाबाईला जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितले. मात्र, रात्री उशीर झाल्याने त्यांना वाहन मिळाले नाही. त्यामुळे कलाबाईच्या जखमेतून रात्रभर रक्तस्त्राव झाला. यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे सकाळी उघडकीस आले. 
 
सकाळीच उरकणार हाेते अंत्यसंस्कार : घटना घडल्यानंतर पाेलिस येतील या भीतीने साेनवणे कुटुंबीयांनी कलाबाई हिचा गुरुवारी सकाळीच अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली. त्यासाठी सकाळी वाजताच मृतदेह स्मशानभूमीत नेऊन ठेवला. मात्र, या घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळाली. गावाचे पाेलिस पाटील श्रीकृष्ण रामदास बारी यांनी स्मशानभूमीत जाऊन मृतदेह बघितला त्या वेळी मृत कलाबाई यांच्या शरीरावर जखमा अाढळल्या. त्यामुळे त्यांनी तत्काळ एमअायडीसी पाेलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील कुऱ्हाडे यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ पथक पाठवून मृतदेह ताब्यात घेऊन पती अशोक सोनवणे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर मृतदेह शिरसाेली येथील स्मशानभूमीतून शवविच्छेदन करण्यासाठी थेट जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात आणण्यात आला. या ठिकाणी उपविभागीय पाेलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी घटनेची माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याचे अादेश दिले. 
 
पोलिस पाटलाच्या सतर्कतेमुळे हत्येची घटना चव्हाट्यावर 
खुनाचा गुन्हा दाखल 

शिरसाेली येथील कलाबाई साेनवणे हिच्या मृत्यूनंतर पाेलिसपाटील श्रीकृष्ण बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात अाला. त्यानंतर अशाेक साेनवणे याला ताब्यात घेतले. त्याची चाैकशी केली असता, त्याने बुधवारी रात्री पत्नीला मारहाण केल्याची कबुली दिली. मात्र, ती खाली पडल्याने बेशुद्ध झाली असे वाटल्याचे त्याने पाेलिसांना चाैकशीत सांगितले. 
 
चिमुकले पोरके 
साेनवणे दांपत्याला करण, रितेश, शिवम, किरण अाणि लखन ही पाच मुले, तर अनिता, काजल अाणि राणी या तीन मुली अाहेत. त्यातील करण अाणि अनिता यांचे लग्न झालेले अाहे, तर उर्वरित सहा जण हे लहान अाहेत. कलाबाईचा मृत्यू झाला, तर अशाेकला अटक झाली. त्यामुळे अाता या लहानग्यांचा सांभाळ काेण करणार हा प्रश्नच अाहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...