आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा रुग्णालयात नवजात मुलीस सोडून माता पसार, 12 दिवसांनंतर आले डॉक्टरांच्या लक्षात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
जळगाव - प्रसुतीनंतर जिल्हा रूग्णालयातील लहान मुलाच्या एसएनसीयू कक्षात नवजात स्त्री जातीच्या अर्भकास सोडून माता पसार झाली आहे. हा प्रकार तब्बल बारा दिवसानंतर जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर माता रेहाना शेखविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
उत्तर प्रदेशमधील लकाई येथील रेहाना हंसराज शेख (वय २५)ही गर्भवती महिला २५ जुलै रोजी प्रसव कळा येत असल्याने जिल्हा रूग्णालयात दाखल झाली होती. त्याच दिवशी ती जिल्हा रूग्णालयातील प्रसूती कक्षात प्रसूत झाली. तिने नवजात स्त्री अर्भकास जन्म दिला होता. त्या अर्भकाला बालकांच्या एसएनसीयू कक्षात दाखल करण्यात आले होते. तर रेहाना हिच्यावर प्रसूती कक्षात उपचार सुरू होते. मात्र, २८ जुलै रोजी रेहाना नवजात अर्भकास एसएनसीयू वार्डातच सोडून जिल्हा रूग्णालयातून निघून गेली. त्यानंतरही अर्भकावर एसएनसीयू वार्डात उपचार सुरू होते. या वार्डात दाखल असलेल्या इतर बालकांना भेटण्यासाठी त्यांचे पालक दररोज येत असतात. त्यांच्या प्रकृतीची डॉक्टरांकडे विचारणा करतात. परंतु, त्या स्त्री जातीच्या अर्भकाविषयी कुणीच विचारणा करत नसल्याचे वार्डातील डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. मात्र, तोपर्यंत रेहाना शेख पसार झाली होती. मातेने अर्भकाला सोडून बारा दिवसांचा कालावधी लोटला होता. अखेर रविवारी जिल्हा रूग्णालयातील डॉ. स्वप्नील चंद्रकांत कळस्कर यांनी जिल्हा रूग्णालयात तक्रार केली. 
 
गेल्या वर्षीही घडला होता प्रकार 
जून २०१६ रोजी सिव्हिलमधील नवजात शिशू अतिदक्षता विभागासमोरील लिफ्टजवळ एका निर्दयी मातेने एक दिवसाच्या अर्भकाला सोडून पलायन केले होते. 
बातम्या आणखी आहेत...