आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : ईदची खरेदी करून गावी जाणारे दांपत्य ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : वाकोद येथील वाघूर नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाने मोटारसायकलला शुक्रवारी धडक दिली. या अपघातात ईदची खरेदी करून मूळ गावी जाणाऱ्या जळगाव येथील पती-पत्नीचा मृत्यू झाला. सुदैवाने या घटनेत त्यांच्यासोबतच्या तीनवर्षीय मुलीला काहीही झाले नाही. 
 
जळगावातील मिल्लतनगरातील रहिवासी लघुपाटबंधारे विभागातील कर्मचारी इम्रानखाँ सरताजखाँ (वय ३०) हे पत्नी अनिसाबी (वय २६) मुलगी शिफासह जळगावहून ईदची खरेदी करून मूळ गावी तोंडापूर येथे जात होते. वाकोदजवळ त्यांच्या मोटारसायकल (एमएच-१९/७६५१)ला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात इम्रानखाँ अनिसाबी हे जागीच ठार झाले. 
बातम्या आणखी आहेत...