आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसीत भूखंडांचे दर दुप्पट; ४ वर्षांनी वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्ह्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंडांचे दर वाढवण्यात आले आहेत. चार वर्षांनंतर ही दरवाढ करण्यात आली असून औद्योगिक वाणिज्यिक भूखंडांचे दर दुप्पट करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात जळगाव वसाहत, अतिरिक्त जळगाव, चाळीसगाव विकास केंद्र आणि भुसावळ विकास केंद्र येथे एमआयडीसी आहे. एमआयडीसीने २०१२मध्ये भूखंडांची दरवाढ केली होती. त्यानंतर चार वर्षांनी आता नवीन दरवाढ करण्यात आली आहे. एकूण ६३२ हेक्टर क्षेत्रात जळगाव एमआयडीसी आहे. त्यापैकी सर्व भूखंड अारक्षित केले आहेत. बहुतांश उद्योग बंद पडले आहेत. काही भूखंडांवर उद्योगच सुरू करण्यात आले नाहीत. मात्र, हे भूखंड एमआयडीसीने परत घेतलेले नाहीत. त्यामुळे नवउद्योजक भूखंड मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

रक्कम भरणाऱ्यांना जुना दर लावा
देकारपत्रदिल्यानंतर वेळेच्या आत २५ टक्के रक्कम भरणाऱ्यांना वाटपपत्र देताना देकारपत्रातील जुना दर लावा. तसेच ज्या प्रकरणात देकारपत्र वैध असेल त्यातील अटी शर्ती पूर्ण केल्यानंतरच जुना दर लावण्यात येणार आहे. अन्यथा सुधारित नवीन दर लावण्यात येणार आहे. रोड विड्थ चार्जेस प्रचलित दरामध्ये समाविष्ट करून येणारा दर भूखंड वाटप, हस्तांतर, मुदतवाढ, वापरातील फेरबदल, पुनर्वाटप आदींसाठी विचारात घेण्यात येणार आहे. ग्रुप स्कीम २००७ च्या वर्गीकरणानुसार जळगाव चाळीसगाव एमआयडीसी ‘ड’ वर्गात आहे तर भुसावळ विकास केंद्र ‘डी प्लस’मध्ये आहे. एमआयडीसीच्या भूखंडामध्ये २०१२ केलेल्या दरवाढीनुसार जळगाव एमआयडीसीचे जुने अौद्योगिक दर ६६५ रुपये प्रतिचौरस मीटर होते. तर निवासी, व्यापारी दर १३३० रुपये प्रतिचौरस मीटर होते. भुसावळ विकास केंद्राचे दर १३५ रुपये तर चाळीसगाव विकास केंद्राचे १३० रुपये प्रतिचौरस मीटर दर होते.

सर्वसामान्य आवाक्याबाहेर
जिल्ह्यात जळगाव, चाळीसगाव विकास केंद्र आणि भुसावळ विकास केंद्र वगळता इतर तालुक्यांमध्ये एमआयडीसी नाही. पुरेशा सेवांअभावी जिल्ह्यात अलीकडच्या काळात मोठा उद्योग सुरू झालेला नाही. काही उद्योग जिल्ह्यातून इतरत्र स्थलांतरीत झाले आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने भूखंडांच्या दरात दुप्पट वाढ केल्याने उद्योग उभारणी करताना उद्योजकांचे बजेट वाढणार आहे. भूखंडांच्या वाढीव दरामुळे एमआयडीसीमध्ये भूखंड घेणे सर्वसामान्य नवउद्योजकांना आवाक्याबाहेर झाले आहेत.
पुढीस स्लाइड्सवर पाहा, असे वाढले दर...