आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करवाढ नेमकी काेणती? सभेविनाच बजेटला मंजुरी; स्थायीत विरोधकांचा गोंधळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिकेचे अंदाजपत्रक प्रशासनाने सादर केल्यानंतरही स्थायी समिती सभेत त्यास अद्याप मंजुरी घेतलेली नाही. त्यामुळे ३१ मार्चनंतर अापाेअाप अंदाजपत्रक मंजूर हाेते. प्रशासनाने उंच इमारतींच्या करात वाढ केली अाहे. मात्र, सभा घेता त्याला मंजुरी देणे म्हणजे सत्ताधाऱ्यांची छुप्या करवाढीला मूक संमती अाहे का? असा सवाल भाजपच्या वतीने स्थायी समिती सभेत करण्यात अाला.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा मंगळवारी सकाळी ११ वाजता सभापती नितीन बरडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत विषयपत्रिकेवरील सर्वच विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात अाली. सर्व विषयांना अवघ्या पाच मिनिटांत मंजुरी दिल्यानंतर भाजपचे सदस्य पृथ्वीराज साेनवणे यांनी खाविअाला पुन्हा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा अजूनही घेण्यात अाल्याने त्याचे कारण विचारण्यात अाले. सभा घेतल्यामुळे प्रशासनाचे अंदाजपत्रक ३१ मार्चनंतर अापाेअाप मंजूर हाेत असते, असे सांगितले जात अाहे. मात्र, याबाबत कायदा काय म्हणताे? त्यात काही तरतूद अाहे का? याचीही विचारणा केली. यावरून सभागृहात बराच वेळ खल चालला.

उत्तरकाेण देणार? यावरून संभ्रम
भाजपचेसदस्य साेनवणे ज्याेती चव्हाण यांनी सभापतींना एकामागून एक प्रश्न विचारायला सुरुवात केल्याने सभापती बरडेंनीही लवकरच सभा घेणार असल्याचे जाहीर केले. तथापि, सभा घेतली तरी त्यात बदल करता येताे का? या प्रश्नावरून मात्र सगळ्यांचीच भंबेरी उडाली. या वेळी पदाधिकारी अधिकाऱ्यांकडे, तर अधिकारी एकमेकांकडे पाहू लागले. अखेर महापालिकेच्या कायद्याचे पुस्तक मागवून त्यात तरतूद शोधण्यात अाली. मात्र, त्यात माहिती आढळून अाल्याने सभेच्या वेळी काय चर्चा करायची ती करा, असे सभापतींनी सांगितले.

भाजपने सभापतींना पुन्हा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताच खाविअाचे श्यामकांत साेनवणे गणेश साेनवणेंनी करवाढ काेणती अाहे हे तुम्हाला माहिती अाहे का? असा प्रतिप्रश्न पृथ्वीराज साेनवणेंना केला. तसेच विषयाची माहिती घेण्याचा सल्ला देत प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला; परंतु साेनवणे चव्हाण यांनी छुप्या करवाढीचा मुद्दा लावून धरत प्रशासनाच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा अर्थ करवाढीला संमती देणे असाच हाेताे, असा टोलाही खाविअाला लगावला. पालिका मूलभूत सुविधा देऊ शकत नाहीत. त्यामुळे करवाढ करणे योग्य नाही, अशी भूमिका भाजपने मांडली. पालिकेच्या सभागृहात अंथरलेल्या गालिचा फाटल्याने त्यात नगरसेवक कर्मचाऱ्यांना पाय अडकण्याच्या कठीण प्रसंगांना सामाेरे जावे लागते.
थम्ब इम्प्रेशनसाेबत फाेटाे हवा
महापालिकेतदाेन बायाेमेट्रिक थम्ब इम्प्रेशन मशीन लावण्यात अाले अाहेत. त्यापैकी एक खराब झाल्याने नवीन मशीन खरेदी करण्याची निविदा मंजूर करण्यात अाली. या वेळी सभापती बरडे यांनी थम्ब इम्प्रेशन मशीन खरेदी करताना त्यात केवळ बाेटांचे ठसे नव्हे, तर चेहरादेखील येईल असे यंत्र खरेदी करा, अशी सूचना मांडली. सभेला अायुक्त संजय कापडणीस, उपायुक्त प्रदीप जगताप, नगरसचिव निरंजन सैंदाणे उपस्थित हाेते.