आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपात ‘नवा भिडू नवा राज’, अधिकाऱ्यांना निराेप; नवे अायुक्त बाेर्डेंचे स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिकेतील २०१३ ते १६ या तीन वर्षांचे एक पर्व शुक्रवारी सायंकाळी तिन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निराेप समारंभानंतर संपले. त्यामुळे शनिवारपासून अाता पालिकेत ‘नवा भिडू नवा राज’ सुरू हाेणार अाहे. जळगाव साेडणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्वच कर्मचाऱ्यांच्या सहकार्याचे स्मरण केले. तर नवनियुक्त अायुक्त किशाेर बाेर्डे यांनी अागामी काळात ‘टीमवर्क’ने काम करण्याचे संकेत दिले. मार्ग खडतर असला तरी त्यातून मार्ग काढण्यासाठी सभागृहासह अधिकाऱ्यांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
महापालिकेचे मावळते अायुक्त संजय कापडणीस, उपायुक्त प्रदीप जगताप, मुख्य लेखापरीक्षक सुभाष भाेर यांच्या निराेप समारंभाचा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी मनपात झाला. अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती नितीन बरडे हाेते. या वेळी माजी महापाैर विष्णू भंगाळे, नगरसेविका शुचिता हाडा, मिलिंद सपकाळे, भांडारपाल राजेंद्र पाटील, अपर अायुक्त साजिदखान पठाण यांनी मनाेगत व्यक्त केले. या वेळी प्रदीप जगताप यांनी तीन वर्षांचा कार्यकाळ हा खूप काही शिकवणारा हाेता. जे प्रयत्न केले ते मनापासून हाेते. त्यामुळे अनुभवांची शिदाेरी साेबत नेत असल्याची भावना व्यक्त केली. सुभाष मराठे यांनी सूत्रसंचालन केले. अाराेग्याधिकारी उदय पाटील यांनी अाभार मानले. या वेळी कर्मचारी चंद्रकांत नांदगुडे यांनी ‘कभी अलविदा ना कहना’ हे गीत सादर केले.

कापडणीसांनी मानले जनतेचे अाभार :
मावळतेअायुक्त कापडणीस यांनी तीन वर्ष एका कुटुंबांसारखे एकत्रित राहून अवघड परिस्थितीतही काम केले. अाज पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या पदाेन्नत्या रखडल्या अाहेत. प्रभाग अधिकारी नाहीत. अतिरिक्त जबाबदारी पार पाडली जात अाहे. शहरासाठी जे काम केले ते प्रामाणिकपणे केले. टीमवर्कने एकत्र उभे राहून जबाबदारी पार पाडली. कर्जफेडीचा प्रवास सुरू झाला असून त्यात यश अाल्यास माेठा ताण कमी हाेणार अाहे. जाताना मनात काेणाबद्दलही अाकस भाव नसल्याचे स्पष्ट केले. काेणतेही वाद हे सभागृहात हाेते, सभागृहाबाहेर नव्हते. २२ वर्षांचा अनुभव मनपात कामी अाला नाही; पण शिकायला खूप मिळाले. जनतेने दिलेले सहकार्य माेलाचे ठरले. त्यांनी पदाधिकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अाभार मानले.

नवनियुक्त अायुक्त किशाेर बाेर्डे यांनी मनपाच्या अार्थिक परिस्थितीचा अभ्यास करून पुढील वाटचाल सुरू करणार अाहे. अार्थिक बाबींची गरज नसलेले तसेच लाेकसहभागातून कामांना प्राधान्य देण्याचे संकेत दिले. महापालिकेची अार्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने ज्या काही उपाययाेजना कराव्या लागतील त्यावर भर दिला जाईल. कर्जफेड ही नित्यनेमाने करण्याचे जाहीर करताना कर्जफेडीसाठी सुरू असलेले प्रयत्न पुढेही कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. सध्या शहरात सुरू असलेल्या विविध माेहीम अभियान तसेच कार्यक्रम यापुढे सुरूच राहणार अाहेत. यासाठी सभागृह, अधिकारी कर्मचाऱ्यांची साथ माेलाची अाहे. अाराेग्य, साफसफाई, अतिक्रमण, उत्पन्न वाढ यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही बाेर्डे यांनी सांगितले.